आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • If The Children Are Constantly Crying And Irritated Pay Special Attention To Them News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:मुले सतत ओरडून रडत अन् चिडचिड करत असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, पालकांचा सुसंवादच अशा मुलांना नवे बळ देईल

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांना व्यक्त होण्यात मदत करा, त्यांच्या मोठेपणीही ही सवय कामी येईल

मुलांचा आक्रस्ताळेपणा आणि रडण्यामुळे आई-वडील अनेकदा त्रस्त होतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी हा प्रकार सुरू असतो. मोठे होईपर्यंत मुलांना वेळोवेळी यासाठी चोप दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, पालकत्व म्हणजे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुलांच्या हट्टातून मार्ग काढण्यातच मोठा काळ व्यतीत होतो. त्याच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. त्यामुळे मुलांच्या या अभिव्यक्तीत कशी मदत करता येऊ शकते, हे तज्ज्ञांकडून समजून घेऊ...

1. मुलांच्या या विरोधामुळे पालकत्वाला योग्य दिशा
अमेरिकी लेखक डॅन कॉइस ओरडून रडण्यास काल्पनिकवादाची अभिव्यक्ती मानतात. ते म्हणाले की, नावडत्या भाज्या किंवा होमवर्क पूर्ण करणे हे त्यांच्या दु:खाचे खरे कारण नाही, तर आई-वडिलांकडून होणारी उपेक्षा हे कारण आहे. त्याला राजकीय विरोधाचे बाल रूप म्हणू शकता. रडल्यामुळे शक्तिशाली व्यक्तीला शक्तिहीन व्यक्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही. खरेतर त्यामुळे पालकत्वाच्या निरंकुश वृत्तीवर अंकुश लागतो.

2. मुलांचे नैराश्य दूर करण्यास मदत करते
तज्ज्ञांच्या मते, मुलांना काहीतरी हवे असते, पण नेमके काय हवे हे त्यांना समजत नसते. तथापि, त्यामुळे आई-वडिलांचे लक्ष आपण वेधू शकतो, एवढे त्यांना कळते. हे ट्रॅफिक जाममध्ये वाहन अडकल्यानंतर हॉर्न वाजवण्यासारखे आहे. म्हणजे ते निरर्थक आहे. अशाच प्रकारे मुलांचे रडणे त्यांचे नैराश्य दूर करण्यासाठी प्राथमिक व्हॉल्व्हप्रमाणे काम करते. नैराश्य दूर करण्यासाठी दुसरी कुठलीही पद्धत नाही.

3. बालपणीचा हा हट्ट मोठेपणीही ठरतो उपयुक्त
कॉइस म्हणाले की, मुले रागात असली तर त्यांना सहानुभूती दाखवा. तुम्ही लहानपणी कशी प्रतिक्रिया देत होते याची तुलना करा. रडणे म्हणजे असंतोष व्यक्त करण्याची योग्य प्रक्रिया. बालपणाप्रमाणेच मोठे झाल्यानंतरही ते अभिव्यक्तीचे महत्त्वपूर्ण साधन ठरते. ते चुकीचे नाही. आयुष्यात लिंबू मिळाले तर लिंबू-पाणी का मिळाले नाही, अशी तक्रार असते. आयुष्यात हट्ट आवश्यक आहे, तेव्हाच आवडीची गोष्ट मिळते.

4. मुलांना प्रेम देऊन त्यांची भीती दूर करा
तज्ज्ञांच्या मते, मुले खूप घाबरल्यामुळे असे वागतात. तेव्हा त्यांना आपल्या प्रेमाची गरज भासते. प्रेम मिळाल्याने ते स्वत:ला आतून भक्कम बनवू शकतात. त्या वेळी तुम्ही त्यांना मदत केली नाही तर त्यांना एकाकी वाटू शकते. फिरताना आई-वडिलांनी कुशीत घ्यावे, असे मुलांना वाटते. वरकरणी तुम्ही दुर्लक्ष करता, पण तुम्हालाही ते हवेसे वाटते. तुम्ही दिलेले हे काही क्षण मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...