आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्र:तैवानमध्ये दुसऱ्यांचा हस्तक्षेप वाढला तर जागतिक युद्ध : चीन, यूएस, यूके व जपानी जहाजांमुळे चीन खवळला

न्यूयॉर्क19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलिपाइन्स सागरात युद्धसराव करताना अमेरिका व मित्रदेशांच्या नौका. - Divya Marathi
फिलिपाइन्स सागरात युद्धसराव करताना अमेरिका व मित्रदेशांच्या नौका.
  • चीन 2025 मध्ये तैवानवर हल्ला करेल

पूर्व आशियात गोंधळाला सुरुवात झाली आहे. तैवानी हवाई हद्दीत शुक्रवारनंतर आपली १५० लढाऊ विमाने पाठवून आपले मनसुबे दाखवून देणाऱ्या चीनने आता धमकावणे सुरू केले आहे. जर अमेरिका आपला सहकारी तैवानच्या बाजूने राहिल्यास तिसरे महायुद्ध भडकू शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार तैवान आगीशी खेळत आहे. त्याने असे करू नये. दरम्यान फिलिपाइन्स सागरात अमेरिकेने दोन, ब्रिटन आणि जपानच्या एकेका युद्धनौकेद्वारे सैन्य सराव सुरू केला आहे. अमेरिका व मित्र पक्षांच्या या नौदलीय सरावामुळेही चीन भडकला आहे. विशेष म्हणजे अमेरिका अधिकृतपणे चीनला मान्यता देऊ शकते. तैवान रिलेशन अॅक्टनुसार वेगळा देश म्हणून तैवानचे भवितव्य शांततेने निर्धारित केले जाऊ शकते.

चीन २०२५ मध्ये तैवानवर हल्ला करेल
तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ चेंग म्हणाले की, २०२५ मध्ये चीन त्यांच्या देशावर मोठा हल्ला करेल. त्यांनी म्हटले की, गेल्या ४० वर्षांत सध्याची परिस्थिती सर्वाधिक कठीण आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितले की, चीन आता पूर्ण हल्ला करण्याची क्षमता बाळगून आहे. परंतु तो पुढील चार वर्षे प्रतीक्षा करेल.

तैवानकडे चीनविरोधी नौदलाचे प्रदर्शन
तैवानी जल क्षेत्रात नौदलाच्या सरावाला चीन आपल्या प्रभुत्वाला आव्हान मानतो. नुकत्याच ऑकस करारामुळेही चीन भडकला आहे. ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात चीनने ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले होते. त्याचे म्हणणे होते की, ऑस्ट्रेलियाने तैवानची बाजू घेऊ नये, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...