आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील बहुतांश लोक अंगदुखीने त्रस्त आहेत. यामुळे त्यांना झोपही येत नाही. शारीरिक क्षमता घटत आहे. याचे एक कारण शरीरात लवचिकपणाची कमतरताही असू शकते. जसजशी आर्थिक समृद्धी वाढत आहे, शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे. लोक घरगुती कामेही यंत्रांद्वारे करत आहेत. शारीरिक हालचाल कमी असल्याने शरीर कठोर होत चालले आहे. अमेरिकेतील लवचिकतेचे प्रशिक्षक डॅन वॅन जॅट सांगतात, लवचिकपणाचा वापर केला नाही तर हा लवचिकपणा आपण गमावून बसतो.
अमेरिकेच्या सेंट दिएगो विद्यापीठाचे ऑर्थोपेडिक फिजिकल थेरपिस्ट अँड्रिव्ह पावलोव्ह सांगतात, लवचिकपणा व गतिशीलता वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण एकमेकांशी संबंधित आहेत. शरीरामध्ये लवचिकपणा नसेल तर गतिशीलता कमी होते. परिणामी लठ्ठपणा वाढतो. जसजशी गतिशीलता कमी होईल तसे तुमचे शरीर लवचिकपणा गमावेल.
वॅन जॅट म्हणतात, लवचिकपणा वाढवण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्ट्रेचिंग करणे गरजेचे ठरते. ती कधीही कुठेही केली जाऊ शकते. प्रत्येक अवयवाच्या स्ट्रेचिंगसाठी रोज ३० सेकंद व आठवड्यातून १० मिनिटे पुरेशी आहेत. वेटलिफ्टिंगमुळेही लवचिकपणा वाढतो. तुमच्या मानेचा लवचिकपणा कमी होत असेल तर स्ट्रेचिंग नियमितपणे करण्यास प्रारंभ करा. कार्यालयात बसूनही स्ट्रेचिंग करता येते. ज्या अवयवात ताठरपणा येत असेल त्याची रोज स्ट्रेचिंग करा. काही आठवड्यातच त्या अवयवांत लवचिकपणा येईल. लवचिकपणामुळे अनिद्रा दूर होते व नैराश्य येत नाही. बोस्टन विद्यापीठाचे प्रा. लॉ डोरा थाॅम्पसन म्हणतात, लवचिकपणामुळे शरीराचे संतुलन चांगले होते.
सरळ वाकून पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला तर तुमचे गुडघे चांगले {सरळ वाकून पायाच्या अंगठ्याला स्पर्श करा. स्पर्श करत असाल तर तुमची कंबर, नितंब व गुडघे पुरेसे लवचिक आहेत. अन्यथा तुम्हाला रोज स्ट्रेचिंग करावी लागेल. {सरळ बसा आणि मान ९० अंशांवर दोन्हींकडे फिरवा. मान पूर्णपणे फिरत नसेल तर लॅपटॉप आणि मोबाइलपासून दूर राहण्याची वेळ आली आहे, असे समजावे.
ओपन बुक टेस्ट : चार पद्धती अवलंबा {सरळ झोपा. गुडघ्यापासून पाय वाकवा. मग उजव्या आणि डाव्या जमिनीपर्यंत घेऊन जा. {दोन्ही हात समोर ठेवा. मग गोल फिरा. {पंजांवर सरळ उभे राहा. हात सरळ वर घेऊन जा. ३० सेकंद असेच राहा. {भिंतीसमोर गुडघ्यांवर बसा. एका गुडघ्याने आणि हाताने भिंतीला ढकला..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.