आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंकट:परिस्थिती बदलली नाही तर जगातील 5 अब्ज लोकांना करावा लागेल जलसंकटाचा सामना

न्यूयॉर्क19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2018 मध्ये जगात सुमारे 3.5 अब्ज लोकांना वर्षभरात एक महिना करावा लागला पाणीटंचाईचा सामना

संयुक्त राष्ट्राने आपल्या नव्या अहवालात जगावर येऊ पाहणाऱ्या पाणीटंचाई संकटाबाबत नवा इशारा दिला आहे. यात म्हटले की, हवामान बदलामुळे पूरस्थिती, कोरडा दुष्काळासह इतरही पाण्याशी संबंधित जोखमींत वाढ झाली आहे. लोकसंख्येसोबत मागणी वाढल्याने पाणी उपलब्धतेत तुटवडा निर्माण झाला असून यामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

या अहवालानुसार २०१८ मध्ये सुमारे ३.५ अब्ज लोकांकडे केवळ ११ महिन्यांपुरतेच पाणी उपलब्ध होते. म्हणजे त्यांना एक महिना पाणी तुटवड्याचा सामना करावा लागला. या दिशेने प्रभावीपणे प्रयत्न केले नाही तर २०५० पर्यंत हा आकडा ५ अब्ज होऊ शकतो.

‘द स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिस २०२१ वॉटर’ नावाने प्रकाशित या अहवालात म्हटले की, पाणीटंचाईमुळे कोट्यवधी लोक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे या क्षणाला पाणी व्यवस्थापन, त्याची देखभाल, पूर्व अंदाज आणि वेळीच इशारा देण्यास सक्षम तंत्रज्ञानात व्यवस्थित ताळमेळ नाही. सोबतच जगभरात हवामान वित्त पोषणाचे अपुरे प्रयत्न होताना दिसत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या हवामान शास्त्र एजन्सीच्या महासचिव पेटेरी टालस यांच्या मते ज्या गतीने तापमानात वाढ होत आहे, यामुळे सहजपणे पाणी उपलब्धतेत बदल होत आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम पावसाचा अंदाज आणि ऋतूंच्या चक्रावरही पडत आहे.

पूरच नव्हे तर कोरडा दुष्काळही : मागील दशकात जमिनीतील पाण्याची पातळी एक सेंटिमीटर दराने कमी झाली आहे. या दरम्यान संपूर्ण जगात दुष्काळाच्या घटनांत वाढ झाली आहे. दुष्काळामुळे सर्वाधिक जीवितहानी दक्षिण अफ्रिकेत झाली आहे. या अहवालानुसार सुमारे दोन अब्ज लोकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

दोन दशकांत वाढल्या पाण्यासंबंधीच्या आपत्ती
अहवालात म्हटले की, मागील दोन दशकांपासून पाणीटंचाईत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही वाढला आहे. याचा सर्वात वाईट परिणाम आशियन देशांत दिसत आहे. मागील एका वर्षापासून जपान, नेपाल, इंडोनेशिया, चीन, पाकिस्तान आणि भारतात जोरदार पाऊस आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लाखो लोकांचे पुनर्वसन करावे लागले. असेच संपूर्ण जगाचेच चित्र आहे. युरोपातील भयावह पुरामुळे जीवितहानी आणि अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...