आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आव्हान वाढले:लस तयार न झाल्यास अमेरिकेत ७०% नागरिकांना कोरोना होईल : संशोधन

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आव्हान वाढले तज्ज्ञांचा दावा -अमेरिकेच्या २२ राज्यांत संसर्ग वाढला, ८ मध्ये स्थिर, २० मध्ये प्रमाण कमी होत आहे
  • सध्या १ टक्क्यापेक्षा कमी लोक बाधित, दक्षिण, पश्चिममध्ये स्थिती बिघडेल
Advertisement
Advertisement

लस तयार न झाल्यास अमेरिकेत कोरोनाने ७० टक्के लोक बाधित होतील. मिनेसोटा विद्यापीठाच्या तज्ञांनी हा दावा केला आहे. या विद्यापीठाचे संसर्गजन्य आजार शोध विभागाचे संचालक डॉ. मायकेल ओस्टेरहोम यांनी सांगितले की, हा विषाणू आराम करणारा नाही. लस किंवा हर्ड इम्युनिटी वाढली तरच कोरोना रोखता येऊ शकतो. अमेरिकेची अंदाजे लोकसंख्या ३३१००२६५१ अाहे. सध्या अमेरिकेत १ टक्क्यापेक्षाही कमी म्हणजे २१६२२६१ कोरोनाबाधित आहेत. ११७८५८ मृत्यू झाले आहेत. डॉ. ओस्टेरहोम यांनी सांगितले की, नव्या आकडेवारीवरून दिसते की, अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी ८ मध्ये संसर्ग स्थिर आहे. २२ मध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत. २० राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले आहे. बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या तज्ञ डॉ. नाहिद भदेलिया यांनी सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये स्थिती जास्त वाईट आहे.

चीन : ६७ नवे रुग्ण, १० राज्यांतील लोकांना बीजिंगचा प्रवास न करण्याचे आदेश

बीजिंग| चीनमध्ये कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यात राजधानी बीजिंगचे ४२ रुग्ण आहेत. प्रशासनाने हार्बिन आणि डालियानसह १० शहरांतील लोकांना बीजिंगचा प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानुसार बीजिंगच्या शिंफदी ठोक बाजारात आलेल्या २९३८६ लोकांची तपासणी करण्यात आली. या बाजारात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. यातील आतापर्यंत १२९७३ जणांचा अहवाल आला आहे. तो निगेटिव्ह आला आहे. शिंफदी बाजारात गेलेल्या प्रत्येकाला दोन आठवडे क्वॉरंटाइन राहण्याचे आदेश दिले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत ८३१८१ रुग्ण आढळले तर ४६३४ मृत्यू झाले आहेत. चिंता: न्यूयॉर्क, ह्यूस्टन पुन्हा लॉकडाऊनकडे, डिस्टन्सिंगचा बोजवारा

रशिया : अमेरिकेत खंडित यंत्रणा, यामुळे संकट कायम, पुतीन यांचा दावा

मॉस्को | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, अमेरिकेत खंडित सरकारी यंत्रणा आहे. यामुळे ते कोरोना संकटातून बाहेर येत नाहीयेत. व्लादिमीर पुतीन यांनी सरकारी टीव्हीवरील एका मुलाखतीत सांगितले की, रशिया सरकार वेगाने काम करत आहे. यामुळे आम्ही कमीत कमी नुकसानीसह आत्मविश्वासाने संकटातून बाहेर पडतोय. रशियात केंद्र आणि राज्य सरकारे मिळून काम करतात. कधीच कोणीच म्हटले नाही की राष्ट्राध्यक्ष किंवा सरकार जे सांगताहेत ते आम्ही करणार नाही. आम्ही त्याला योग्य मानत नाही. रशियात आतापर्यंत ५३७२१० प्रकरणे आढळली असून ७०९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

चिंता: न्यूयॉर्क, ह्यूस्टन पुन्हा लॉकडाऊनकडे, डिस्टन्सिंगचा बोजवारा

न्यूयॉर्क शहर, ह्यूस्टनमध्ये पुन्हा लॉकडाऊन केला जाऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासन याबाबत विचार करत आहे. दोन्ही शहरांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. एवढेच नव्हे तर लोक बार, रेस्टॉरंटबाहेर दारू पिऊन मास्क न लावता फिरताहेत. न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर अँड्रयू क्युमो यांनी सांगितले की, फिजिकल डिस्टन्सिंग उल्लंघनाच्या २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांत करण्यात येणारी अनलॉकची योजना धोक्यात येईल. सर्वाधिक तक्रारी मॅनहटन आणि हॅम्पटन्समध्ये आल्या आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, टेक्सासच्या ह्यूस्टन शहरातही लोक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत.

Advertisement
0