आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपण २० जानेवारीला जो बायडेन यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च ट्वीट करून सांगितले आहे. ट्रम्प आपल्या अखेरच्या दिवसांचा उपयोग कसा करतात याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ते फ्लोरिडात एक सभा आयोजित करू शकतात किंवा स्कॉटलंडमधील आपल्या गोल्फ क्लबवर जाऊ शकतात.
व्हाइट हाऊसच्या सूत्रांनुसार, ट्रम्प फ्लोरिडा येथील मार-ए-लोगो रिसॉर्ट येथे जातील. त्यासाठी ते आपल्या वैयक्तिक बोइंग ७५७ चा वापर करतील. त्यांच्या विमानाने शपथविधीच्या आधी उड्डाण केले तर त्याला एअरफोर्स वनऐवजी एक्झिक्युटिव्ह वनचे कॉलसाइन दिले जाईल. ट्रम्प अवकाशात असताना बायडेन यांचा शपथविधी झाला तर मध्येच ट्रम्प यांच्या विमानाला सामान्य नागरिकांच्या कॉल साइनमध्ये बदलले जाईल.
अलीकडच्या काळात मावळते अध्यक्ष शपथविधी समारंभात भाग घेतात. शेवटच्या वेळी एअरफोर्स वनमध्ये बसून ठरवलेल्या ठिकाणी जातात. अलीकडच्या दशकांत मावळते अध्यक्ष आणि प्रथम महिला हेलिकॉप्टरने कॅपिटल हिलच्या मागील अँड्रयूज तळावर जातात. हे उड्डाण पाच िमनिटांचे असते. अँड्रयूज तळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. कर्मचारी, मित्र आणि इतर शुभचिंतक शुभेच्छा देतात. माजी अध्यक्ष बराक ओबामा हे या समारंभानंतर कॅलिफोर्नियाला गेले होते. त्यांच्या विमानाला सॅम ४४ हा कॉल साइन देण्यात आला होता.
न्यूक्लियर कोड असलेला नवा न्यूक्लियर फुटबॉल तयार
ट्रम्प बायडेन यांच्या शपथविधीआधी निघाले तर त्यांना प्रवासात अध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था मिळेल. अण्वस्त्रांचा कोड असलेली २० किलोची ब्रीफकेस (न्यूक्लियर फुटबॉल) त्यांच्यासोबत असेल. व्हाइट हाऊसने दुसरी ब्रीफकेसही तयार केली आहे. शपथविधीनंतर ही ब्रीफकेस लगेचच सक्रिय होईल आणि ट्रम्प यांचा कोड निष्क्रिय होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.