आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजच्या आयुष्यात आपण एखाद्या नकारात्मक घटनेसाठी स्वत:ला जबाबदार मानू लागतो, भले तसे नसले तरीही. इतर लोक आपल्याबाबत काय विचार करत असतील, असाही विचार करतो. मात्र तो चुकीचा असतो. तो आपल्या भावना, भूतकाळातील घटना आणि संशयावर आधारित असतो. कुठलीही गोष्ट स्वत:शी जोडण्याची ही प्रवृती भावनात्मक आणि व्यावहारिक दरवाजेही बंद करते. अशा स्थितीत काय करावे हे सांगताहेत सीबीटी थेरपिस्ट जोएल मिंडेन...
भावनांवर वाद घातला जाऊ शकत नाही, ती जाणवते
भावना आणि विचार यात खूप कमी फरक आहे. भावना एका शब्दांत सांगता येऊ शकते. उदा. भीती, आनंद. तर विचार भावनांचे अनुसरण करतात. तुम्ही एखाद्यासोबत डिनर करत आहात आणि तो गप्प असेल तर त्याला गप्पा मारणे आवडत नाही असे तुम्हाला वाटते. हा विचार आहे, तो खरा नाही. भावनांवर वाद होऊ शकत नाही. तुम्हाला ती जाणवते. भलेही तसे नसले तरीही.
जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे हेच सर्वोत्तम
पुढच्या वेळी भावना जाणवली तर विचारांशी ताळमेळ बसवा. उदा. खरेदीदरम्यान दीर्घ काळ न पाहिलेल्या परिचिताशी भेट होते. बोलल्यानंतर तो आपल्या आयुष्यात महत्त्वाचा नाही असे तुम्हाला वाटते. असे असेल तर भावना ओळखा. ज्यातून ही भावना निघाली त्या विचारापर्यंत आपण पोहोचू शकतो का हे पाहा. जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे हे सर्वात चांगले.
विचारांच्या बाजूची व विरोधी प्रमाणांची यादी तयार करा
तुमचे विचार तुमचा पूर्वग्रह सांगू शकतात. त्यामुळे आपल्या विचारांची बाजू आणि विरोधी प्रमाणांची यादी तयार करा. यामुळे मूळ गोष्टीसोबत राहायचे की जास्त प्रशंसेच्या पर्यायासोबत जायचे आहे. सामाजिक स्थिती संदर्भात दिशाभूल करणारे विचार तुमची सवय होऊ होऊ शकतात. त्यामुळे जेवढे होता येईल, त्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करा.
स्वत:ला विचारून पाहा काय उपयोगी? अनिश्चितता स्वीकारा
आपले विचार ओळखा, आव्हान देण्याची व बदलण्याची संधी मिळाल्यास तुमच्यासाठी काय उपयोगी असेल याचा शोध घ्या. पूर्वग्रहदुषित विचारांचा अंदाज बांधून तुम्ही ते वैयक्तिरित्या घेण्यास टाळू शकता. अनिश्चितता स्वीकारा. तुम्ही नेहमी हे ओळखू शकत नाहीत की, लोक तुमच्याबाबत काय विचार करताहेत. मात्र, स्वत:शी कसे वागावे हे तुम्ही ठरू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.