आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत कुत्र्यांची धोकादायक प्रजाती असल्यास विमा कंपन्या संबंधित घराचा विमा काढणे टाळतात. अशा जातीचा कुत्रा एखाद्याला हानी पोहोचवू शकतो, असे ते विमा घेऊ इच्छिणाऱ्या घरमालक किंवा भाडेकरूंना सांगतात. बहुतेक राज्यांमध्ये कंपन्या अनेकदा जास्त शुल्क आकारतात किंवा धोकादायक मानल्या जाणाऱ्या कुत्र्यांचा विमा घेत नाहीत, त्यात डॉबरमन पिन्सर्स, चाऊ चाऊ, रॉटवेलर्स, जर्मन शेफर्ड््स, मेस्टिफसह इतर धोकादायक कुत्र्यांचा समावेश आहे. ज्या घरात पिट बुल असतो त्याचा कोणत्याही परिस्थितीत विमा होत नाही. म्हणूनच घरमालक किंवा भाडेकरू विमा फॉर्ममध्ये कुत्र्याच्या तपशिलात पिट बुलव्यतिरिक्त इतर जातीचा कुत्रा असल्याची माहिती देतात.
वास्तवात इन्शुरन्स इन्फर्मेशन इन्स्टिट्यूटनुसार, विमा कंपन्यांनी २०२१ मध्ये कुत्रा चावल्याच्या दाव्यांसाठी ६८६७ कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, कुत्र्यांच्या जातीवर आधारित गृहविम्याच्या पॉलिसीला विरोध वाढत आहे. न्यूयॉर्क राज्यात जानेवारीमध्ये लागू झालेला कायदा विमा कंपन्यांना कव्हरेज, विमा प्रीमियम दर, पॉलिसीचे नूतनीकरण किंवा कुत्र्यांच्या जातीवर आधारित घरमालकाची पॉलिसी रद्द करणे यांसारख्या घटकांवर निर्णय घेण्यापासून प्रतिबंधित करतो. पेनसिल्व्हेनिया, नेवाडा आणि मिशिगन यांनीदेखील विम्यामध्ये जातीच्या समावेशावर बंदी घातली आहे. प्राण्यांबाबत क्रूरता रोखण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या अनेक संस्थांचे म्हणणे आहे की, विम्यावरील बंदीमुळे अनेक कुत्र्यांना आश्रयस्थानात राहावे लागत आहे. ते म्हणतात, कुत्र्याचे वर्तन जातीवर नव्हे, तर त्याला दिलेल्या वागणुकीवर अवलंबून असते, याचे शास्त्रीय पुरावे आहेत.
तथापि, अनेक जण जीव घेणाऱ्या पिट बुलसह इतर आक्रमक जातींवर अधिक कडक बंदी घालण्याच्या बाजूने आहेत. कंपन्यांना आक्रमक स्वभावाच्या कुत्र्यांसह घरांचा विमा उतरवण्यास भाग पाडणे सर्व पॉलिसीधारकांचा खर्च वाढेल, असा इशारा न्यूयॉर्क इन्शुरन्स असोसिएशनने दिला आहे.
एक हजार जातींवर बंदी
अमेरिकेतील ३७ राज्यांमध्ये एक हजार स्थानिक जातींवर निर्बंध आहेत. कॉर्नेल कॉलेज ऑफ व्हेटर्नरी मेडिसिनचे प्राध्यापक एरिक हेन्री यांच्या मते, पिट बुल आणि इतर भयंकर जातीच्या कुत्र्यांना सार्वजनिक उद्यानांमध्ये नेण्यास मनाई आहे. डॉग्जबाइट या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा मागोवा घेणाऱ्या एका गटाच्या अहवालानुसार, २००५ ते २०२० दरम्यान कुत्र्यांनी ५६८ अमेरिकन लोकांना ठार केले. पिट बुल्सच्या हल्ल्यामुळे ३८० मृत्यू झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.