आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:मोबाइलवर शिंकल्यास 1 मिनिटात होईल कोरोना टेस्ट, झिका व्हायरससाठी बनले हाेते तंत्रज्ञान

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोनवर बोलताना शिंकल्याने किंवा खोकल्यामुळे कोरोना संसर्ग आहे की नाही, हे सांगणारे तंत्रज्ञान येत असल्याचा दावा, अमेरिकेतील एक रिसर्च टीमने केला आहे. टीमकडून एक सेन्सर बनवले जात आहे, जे मोबाइलला जोडले जाईल.

संशोधन करणाऱ्या पथकानुसार, स्मार्टफोनला जोडण्यात येणाऱ्या सेन्सरमुळे ज्या व्यक्तीने फोनवर बोलताना शिंकले किंवा खोकले आहे, त्या कोरोना आहे की नाही, हे जाणून घेता येईल. सेन्सर विकसित करणाऱ्या टीमचे प्रमुख प्राध्यापक मसूद तबीब-अजहर सांगतात, हे सेन्सर सुमारे १ वर्षांपासून बनवणे सुरु आहे. त्यांनी सांगितले, याचा हेतू जीका विषाणूचा शोध घेणे होते. डिव्हाइसचे प्रोटोटाइप १ इंच लांब आहे. हे ब्ल्यूटुथद्वारे स्मार्टफोनला जोडता येईल. वापरकर्त्याला आपल्या लाळेचा मायक्रोस्पोकिक पार्टिकल टाकण्यापूर्वी फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये सेन्सर लावून अॅप सुरु करावे लागेल. एक मिनिटानंतर मोबाइलवर याचा निकाल कळेल.

बातम्या आणखी आहेत...