आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत अवैधपणे शिरण्याचा प्रयत्न:कॅनडा किंवा मेक्सिकोमार्गे अमेरिकेत 6 लाख भारतीयांचा अवैध प्रवेश

टोरंटो | सालिक अहमद.2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एजंट 60-70 लाखांत पर्यटक बनवून तुर्की-फ्रान्सला पाठवतात

अमेरिकेत अवैध प्रवेश करणे किती जोखमीचे आणि खर्चिक आहे, याचा अंदाज या वर्षी घडलेल्या दोन घटनांवरून घेता येईल. मागील आठवड्यात कॅनडा-अमेरिका सीमेवर भारतीय कुटुंबीय मृतावस्थेत आढळले. हे कुटुंब गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील प्रवीण चौधरींचे होते. अशाच प्रकारे जानेवारीतही गुजरातच्या जगदीश पटेल यांच्या कुटुंबाचा जंगलात अति थंडीमुळे मृत्यू झाला होता. दोन्ही घटनांत एक समान बाब म्हणजे ही दोन्ही कुटुंबे अमेरिकेत अवैधपणे शिरण्याचा प्रयत्न करत होतेे. यासाठी ६०-७० लाख रु. दिले होते. ज्या लोकांनी त्यांना प्रवेश देण्यासाठी पैसे घेतले होते, ते अजूनही पकडले गेले नाहीत. वास्तविक, कॅनडा आणि अमेरिकेची ९ हजार किमी सीमा संयुक्त आहे. यूएस बॉर्डर पेट्रोलने २०२२ मध्ये १० लाख अवैध स्थलांतरितांना पकडले आहे. यात बहुतांश मेक्सिकन आणि भारतीय आहेत. त्यांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी एजंटांची पूर्ण फौजच आहे. ते वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत आहे. प्रमुख बाब म्हणजे अडचण केवळ प्रवेशाची आहे. त्यानंतर नोकरी सहज मिळते. कारण भारतीयांच्या मालकीच्या अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या अवैध स्थलांतरितांना कमी पगारावर नोकऱ्या देतात. यामुळे त्यांचा खर्च आणि करही वाचतो. दुसरीकडे अवैध स्थलांतरितांना कामासोबत राहण्यासाठी जागाही मिळते. ज्यांना अमेरिकेला जायचे असते ते प्रथम स्थानिक एजंटशी संपर्क करतात. एका प्रवेशासाठी ६०-७० लाख रुपये घेतले जात आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी रक्कम दुप्पट होते. एजंट गावातीलच एखाद्याला हमीदार बनवतात, ज्याच्या खात्यातून एकाच वेळी संपूर्ण रक्कम दिली जाते. पुढे मोठा एजंट बनावट पासपोर्ट बनवतो. हवाईमार्गाने अमेरिकेत प्रवेश जवळपास अशक्य आहे. त्यामुळे कॅनडा किंवा मेक्सिकोमार्गे प्रवेश दिला जातो. येथे पोहोचवण्यासाठी प्रथम पर्यटन व्हिसावर तुर्की, फ्रान्स किंवा मोरक्कोला पाठवले जाते. नंतर कॅनडा किंवा मेक्सिकोला नेले जाते. कॅनडात एजंट राहण्याची व्यवस्था करतात. नंतर त्यांना पायी सीमा पार करण्यास मदत करणारे वेगवेगळे गट आहेत. खराब हवामान, जास्त बर्फ, नदी व दलदलीमुळे प्रवास जोखमीचा असतो. मुलांसमवेत तर आणखीच कठीण. लोकांकडे काडक्याच्या थंडीपासून बचावासाठी विशेष कपडे नसतात, त्यामुळे परिस्थिती जीवघेणी ठरते. थिंक टँक न्यू अमेरिकन इकॉनॉमीच्या अहवालानुसार अमेरिकेत एक कोटी अवैध स्थलांतरित आहेत. यात ६ लाख भारतीय असून जे मेक्सिको किंवा कॅनडासीमेवरून अमेरिकेत घुसले होते. आता अनेक जण बेपत्ताही आहेत. तथापि, अवैध स्थलांतरितही अमेरिकी अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. एकटे अवैध स्थलांतरितच अमेरिकी अर्थव्यवस्थेत २३ हजार कोटींचे योगदान देतात. परंतु, दस्तावेज नसल्याने त्यांना किमान मजुरीही मिळत नाही. त्यांच्यावर सरकारी खर्चही केला जात नाही.

पकडल्यावर डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी, एजन्सी राजी न झाल्यास निर्वासन पकडल्या गेल्यानंतर अवैध स्थलांतरितांना डिटेन्शन सेंटरला पाठवले जाते. ते आपल्या देशात असुरक्षितेतची भीती दाखवून शरण मागतात. अमेरिकी एजन्सी राजी न झाल्यास निर्वासन केले जाते. सीमा पार केल्यानंतर लोक कुटुंब, नातेवाइकंकडे जातात. ते त्यांना स्थायिक होण्यास मदत करतात.