आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या इलिनॉय राज्यात सोमवारी धुळीच्या चक्रीवादळामुळे येथील महामार्गावर भीषण अपघात झाला. जोरदार सुटलेल्या चक्रीवादळामुळे महामार्गावरील वाहनचालकांना समोर काहीच दिसत नव्हते. यात कार-वाहनांचा वेग जास्त असल्याने सुमारे 80 गाड्यांची जोरदार धडक झाली. यात 20 व्यावसायिक वाहने आणि 60 हून अधिक कारचा समावेश होता. .या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.
इलिनॉय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 2 वर्षांच्या मुलांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. चक्रीवादळाच्या वेळी ताशी 70 किमी वेगाने वारे वाहत होते. धडकेनंतर अनेक वाहने एकमेकांवर आदळली. सेंट लुईसच्या उत्तरेस 75 मैल (120 KM) अंतरावर असलेल्या माँटगोमेरी काउंटीमध्ये महामार्ग दोन्ही दिशांनी बंद करण्यात आला होता. जो आज म्हणजेच मंगळवारी दुपारपर्यंत खुला केला जाणार आहे.
शेतामधली माती देखील वाऱ्याबरोबर उडून गेली
सोमवारी सकाळी 11 वाजता या अपघाताची माहिती समोर आली. सेंट लुई हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, धुळीचे वादळ नव्याने नांगरलेली शेते आणि वायव्येकडील जोरदार वारे यांच्या संयोगाने निर्माण झाले होते. ज्याचा वेग ताशी 70 किमी होता. त्यामुळे समोर काहीच दिसत नसल्याने ही अपघाताची घटना झाली.
चक्रीवादळ गेल्यानंतरचे घटनास्थळावरील फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.