आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:अमेरिकेत रमजानदरम्यान नमाजावेळी इमामांवर चाकूहल्ला; हल्लेखोर अटकेत

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत रमजानदरम्यान न्यू जर्सीच्या पॅटर्सनमध्ये ओमर मशिदीत नमाजावेळी इमाम सैयदअल नकिब(६५) यांच्यावर एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. हल्लेखोर सेरिफ जोरबाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. घटनेवळी २०० लोक उपस्थित होते. इमामांची स्थिती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. याच्या आदल्या दिवशी अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स कौन्सिलने चौकशीची मागणी केली होती. २०२२ मध्ये मुस्लिमविरोधी हालचालीबाबत १५२ तक्रारी पॅटर्सनमध्ये प्राप्त झाल्या होत्या. पॅटर्सनच्या १.५ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येत २५ ते ३० हजार मुस्लिम आहेत.