आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Immediate Single Dose Of Vaccine For Children In Many Countries! Trying To Avoid The Side Effects Of Myocarditis

नवी रणनीती:अनेक देशांमध्ये मुलांना लसीचा तूर्त एकच डोस! म्योकारडिटिसच्या साइड इफेक्टपासून बचावाचा प्रयत्न

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेसह जगातील अनेक देशांत मुलांना कोरोनाची लस देण्याचे सत्र सुरू झाले आहे. अमेरिकेत अनेक पालकांच्या मनात मुलांना लस देण्याबाबत साशंकता आहे. परंतु काही देशांनी नवी रणनीती लागू केली आहे. मुलांना कोरोनाचे दोनएेवजी एक डोस दिला जात आहे. हाँगकाँग, ब्रिटन, नॉर्वेसह अनेक देशांनी १२ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना फायझर बायोएनटेकचा एकच डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.डेन्मार्क व स्वीडनने बुधवारी मुलांना मॉडर्नाचा एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मुलांमध्ये म्योकारडिटिसचे साइड इफेक्ट दिसून आले होते. म्योकारडिटिसमुळे मुलांना हृदयात जळजळ होण्याची समस्या जाणवू लागली.एमआरएनएचे दोन डोस घेतल्यानंतर हे घडून येते. अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार जूनच्या आकडेवारीनुसार दहा लाख डोस घेतलेल्या मुलांपैकी म्योकारडिटिसची ७० प्रकरणे दिसून आली होती. परंतु या घटनेमुळे दोन डोसबाबत फेरविचार करायला भाग पाडले.

इस्रायलमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याने चिंतेत भर
इस्रायलमध्ये म्योकारडिटिसचे सर्वाधिक प्रकरणे १६ हून जास्त वयाच्या मुलांमध्ये दिसून आले. अशा मुलांमध्ये म्योकारडिटिसची लक्षणे दिसली. इस्रायलमध्ये ५४ गंभीर लक्षणे असल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. एका अन्य संशोधनानुसार १६ ते १९ वयोगटापर्यंत मुलांना दोन डोस दिल्यानंतर फरक पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलींच्या तुलनेत मुलांतम्योकारडिटिसचे प्रमाण जास्त
पीटर्सबर्ग विद्यापीठातील डॉ. वॅलिड गॅलार्ड म्हणाले, दोन डोस घेतलेल्या मुलांमध्ये म्योकारडिटिस झाल्याचे निष्पन्न झाले. लंडन विद्यापीठातील डॉ. जेरेमी ब्राऊन म्हणाले, म्योकारडिटिसमुळे मुलांच्या हृदयावर दुष्परिणाम होतो, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु त्यावर तूर्त तरी अभ्यास केला जात आहे. म्योकारडिटिसमुळे चिंता वाटू लागली आहे.

अमेरिकेत सुमारे दीड लाख मुले अनाथ
कोरोनाच्या काळात अमेरिकेत सुमारे सव्वा लाख मुले अनाथ झाली. मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित लेखकांच्या म्हणण्यानुसार देशात सर्वाधिक कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक समुदायाची मुले अनाथ झाली. कोरोनाकाळात अमेरिकेतील अनाथालयांतील मुलांचे प्रमाण १४ टक्के वाढले आहे. दुसऱ्या क्रमांकावर मिसिसिपी आहे.

बातम्या आणखी आहेत...