आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:स्थलांतरितांना कमला हॅरिस ‘अमेरिकन ड्रीम’चे प्रतीक वाटतात, माेदी-ट्रम्प यांची मैत्रीही त्यांना भावनारी!

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र क्वीन्स येथील जॅक्सन हाइट बाजारपेठेचे आहे. रस्त्याच्या कडेला दिल्ली हाइट्स रेस्तराँ आहे. येथील लज्जतदार भारतीय पदार्थ प्रसिद्ध आहेत.
  • स्थलांतरित लाेकांचे सर्वात माेठे आश्रयस्थान जॅक्सन हाइट्सहून वृत्तांत

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहम्मद अली
जॅक्स हाइट्सचे दक्षिण आशियाई मार्केट क्वीन्समध्ये आहे. न्यूयाॅर्कचा मुख्य भाग येथून केवळ ८.५ मैलावर आहे. तीन रेल्वे बदलून मॅनहॅटन ते क्वीन्स जाण्याची सफर येथील स्थलांतरितांच्या संस्कृतीमधील एका वाक्प्रचाराची आठवण करून देणारा ठरताे. त्याचा आशय असा- क्वीन्स ते मॅनहॅटनचे अंतर केवळ चार मैलाचे आहे. परंतु मॅनहॅटनच्या मुक्कामी जाण्यासाठी पिढ्यान््पिढ्या निघून जातात. सध्या निवडणुकीचा ज्वर दिसताे. म्हणूनच जॅक्सन हाइटवर नजर पाेहाेचणे प्रासंगिक म्हणावे लागते. कारण स्थलांतरित व मूलनिवासी हा अमेरिकी निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीत स्थलांतरित किंग मेकरची भूमिका निभावतात. त्यादृष्टीने जॅक्सन हाइट्स संपूर्ण जगाचे इमिग्रेशन हबच. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ग्रीस, इटली, नेपाळ, हिस्पॅनिक, त्रिनिदाद, हाैथी.. इत्यादी.

अमेरिकेत न्यूयाॅर्कच्या जॅक्सन हाइट्सहून जास्त सांस्कृतिक वैविध्य जगात कुठेही पाहायला मिळत नाही. स्थानिक लाेकांच्या मते येथे १६७ हून जास्त भाषा बाेलणारे लाेक राहतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे राजकारण भलेही स्थलांतरितांच्या विराेधातील असू दे, परंतु ट्रम्प यांचे मूळ स्थलांतरित व्यक्तीशी संबंधित आहे. ते अशा व्यक्तीचे नातू आहेत. जर्मनीहून अमेरिकेत आलेल्या त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष याच ठिकाणाहून सुरू झाला हाेता. ट्रम्प व त्यांचे वडील फ्रेड यांचा जन्मदेखील जॅक्स हाइट्सपासून दाेन किलाेमीटरवरील क्वीन्समध्ये झाला हाेता. येथेच ट्रम्प यांचे बालपण गेले. ट्रम्प यांच्या वडिलांनी रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील उद्याेगाची सुरुवातही क्वीन्समधूनच केली हाेती. जॅक्सन हाइट्सचा माइलस्टाेन चाैकात एक माेठी इमारत आहे. या इमारतीला डायव्हर्सिटी प्लाझा म्हणून आेळखले जाते. याच इमारतीत जॅक्सन हाइटचे सर्वात माेठे साऊथ एशियन मार्केट आहे. १९३० च्या दशकात अर्ल थिएटर येथे हाेते. तेथे प्राैढांसाठीचे सिनेमे दाखवले जात. १९६०-७० च्या दशकात येथे अचानक भारतीयांचा लाेंढा आला आणि १९८० मध्ये अर्ल थिएटर ईगल बाॅलीवूड सिनेमामध्ये परिवर्तित झाले. त्या काळी हेच भारतीय समुदायासाठी मनाेरंजनाचे एकमेव केंद्र बनले हाेते. २००९ मध्ये भारतीय अभिनेते संपावर गेले आणि थिएटर कंपनी बंद झाली. तेव्हापासून येथे दक्षिण आशियाई फूड काेर्ट सुरू झाले. येथील चाैकात उभे राहिल्यास भारतीय शहरी जीवनाची झलक दिसू लागते. तशीच गर्दी, तसेच रस्ते, पानटपऱ्या, गुटखा खाऊन रस्ते व भिंतीवर मारलेल्या पिचकाऱ्या इत्यादींमुळे भारतात असल्यासारखे वाटते. पान खाऊन थुंकू नये, असे फलक अनेक ठिकाणी दिसतात तरीही रस्ते, भिंती रंगलेल्या आहेत. डायव्हर्सिटी प्लाझा एखाद्या मधमाशीच्या पाेळीसारखा आहे. दक्षिण आशियातील खाद्यपदार्थांची रंगीबेरंगी दुकानांची या भागात रेलचेल दिसून येते. कबाब असाे की समाेसा. मलाई लस्सी, हिल्सा मासा असाे की राेहू. बटर चिकन, दही भल्ले, चाट किंवा पुरी. अशा सगळ्याचा स्वाद येथे घेता येताे. त्याच्या एका बाजूच्या दुकानात इंदूरच्या लाेकांच्या पसंतीचा पान व गुटखाही मिळताे. येथील गर्दी, पेहराव, दुकाने व संस्कृती पाहून काेणे एकेकाळी हा भाग म्हणजे मध्यमवर्गीय श्वेतवर्णीयांचा अड्डा असायचा यावर विश्वास बसत नाही.

७५ वर्षीय माेहंमद मुस्तकीम यांचे रस्त्याच्या कडेला स्टाॅल आहे. ते बांगलादेशहून ८० च्या दशकांत येथे स्थायिक झाले. जाड टाेपी, रुमाल, हँड सॅनिटायझर विकतात. त्यांच्याशी राजकारणाबद्दल गप्पा करू म्हटले तर त्यांनी दुकानातील वस्तूंचे दर सांगायला सुरुवात केली. हँड सॅनिटायझरची बाटली ५ डाॅलरला, दाेन सेकंदांनंतर ४ डाॅलरला हाेते. माेलभाव हाेत असलेला न्यूयाॅर्कमधील एकमेव ठिकाण म्हणून या भागाची आेळख आहे. काही वेळाने मुस्तकीम म्हणाले, आमच्यासाठी तर आेबामाच ठीक हाेते. त्यांच्यानंतर काेणी आले नाही. या वेळी कमला हॅरिस आल्या, असे लाेक म्हणतात. एवढ्यात मुस्तकीम यांनी मला सॅनिटायझर विकले. मुस्तकीम यांच्या दुकानाजवळ बाॅम्बे ब्रायडल हे दुकान आहे. त्याचे मालक सुरिंदर पाल आहेत. ते ७० च्या दशकात लुधियानाहून येथे स्थायिक झाले. ते म्हणाले, त्या काळी भारतीयांची धूम हाेती. आग्नेय आशियातील लाेकांसाठी ही बाजारपेठ जिवंत कहाणीसारखे आहे. लाेक येथे येतात. प्रगती झाल्यानंतर इतरत्र स्थलांतरित हाेतात. पाल दाेन दशकांहून जास्त काळापासून अमेरिकी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. परंतु निवडणुकीवर बाेलू इच्छित नाहीत.

अमेरिकेचे पारंपरिक मतदान खुले असते. परंतु स्थलांतरित भारतीयांचे वागणे वेगळे जाणवते. संकाेच दिसताे. भीतीही जाणवते. परंतु घड्याळ दुरुस्त करणारे संताेष राणा म्हणाले, अमेरिकेला एकच गाेष्ट महान बनवते. ते आहे अमेरिकन ड्रीम. ही स्वप्ने डाेळ्यात साठवून जगभरातील लाेक येथे येतात. अमेरिकेत कष्ट करून त्यांना शिखरापर्यंत पाेहाेचायचे असते. राणा ९० च्या दशकात मेरठहून येथे आले हाेते. काहीसे संतापलेले वाटले. मात्र, स्पष्टपणे म्हणाले अमेरिकी स्वप्नांमुळेच कमला हॅरिस पहिल्या कृष्णवर्णीय उपराष्ट्राध्यक्ष हाेतील. ट्रम्प यांनी या अमेरिकन ड्रीमच्या संकल्पनेला नष्ट करण्याचे प्रयत्न केले. जॅक्सन हाइटची ही बाजारपेठ स्थलांतरितांच्या जीवनाला महागाईची झळ बसू देत नाही. प्रत्येक वस्तूच्या डाॅलरला रुपयांत बदलणे हा भारतीय स्थलांतरितांच्या जीवनशैलीचा अतूट भाग आहे. न्यूयाॅर्कच्या दुसऱ्या भागात केस कापण्याचा खर्च किमान ३० डाॅलर इतका येताे. येथे १० डाॅलरमध्ये भागते. माेहंमद रफी, किशाेरकुमार यांची सदाबहार गाणी एेकत केस कापण्याचा आनंद द्विगुणित हाेताे. गुजरातचे परिमल हेअर ड्रेसरचे काम करतात. ते माेदी व ट्रम्प यांच्या मैत्रीवर बाेलतात. ट्रम्प इंडियाचे मित्र आहेत. त्यांना भले-बुरे म्हणणे याेग्य वाटत नाही. परिमल यांच्या दुकानाच्या काही पावलांवर न्यूयाॅर्कमधील सर्वात प्रसिद्ध इंडियन किराणाचे सुपरमार्केट पटेल स्टाेअर आहे. हे स्टाेअर न्यूयाॅर्कमध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करते. खाण्यापिण्यापासून पूजेच्या साहित्यापर्यंत येथे सर्व काही उपलब्ध हाेते. येथे हवनासाठी आंब्याच्या पानांची विक्रीही हाेते. पाच पानांची किंमत एक डाॅलर आहे. पटेल स्टाेअरची गल्ली दिल्लीच्या लाजपत मार्केटचा अनुभव देणारी ठरते. रस्त्याच्या कडेला काेणी हस्तकलेच्या वस्तू विकत आहे. काेणी कृत्रिम ज्वेलरी विकतेय. तेथेच वरील भागात असली दागिन्यांची दुकाने आहेत.

पटेल स्टाेअरच्या बाहेर असलेले किशाेर म्हणाले, दरराेज ३-४ हजार लाेक येथे भेट देतात. ते बायडेन यांची स्तुती करतात. ट्रम्प भलेही माेदींचे मित्र असतील, मात्र ते भारताबद्दल चांगला विचार करत नाहीत. भारत व भारतीयांच्या हितसंबंधाच्या विराेधात निर्णय घेतात. त्यांचे संपूर्ण राजकारण त्यावर अवलंबून आहे, असे किशाेर सांगतात. जॅक्सन हाइट्सच्या गल्लीबाेळांत प्रसिद्ध भारतीय लेखक सुकेतू मेहता यांचे बालपण गेले. त्यांच्या गुजराती वडिलांनी जॅक्सन हाइट्समध्ये घर घेतले. ‘धिस लँड इज अवर लँड : अॅन इमिग्रेट्स मॅनिफेस्टाे’चे ते लेखक आहेत. जॅक्सन हाइट्समध्ये १.८ लाख लाेक राहतात.