आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाभियाेग:ट्रम्प यांच्यावर महाभियाेगाची तयारी,शपथ समारंभावर आता हिंसेचे सावट

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाभियोग साेशल मीडियावरील पाेस्ट, हेट ग्रुपचे संकेत, तज्ञांचा इशारा

अमेरिकेचा संसद परिसर अर्थात कॅपिटल हिलवर झालेल्या दंगलीच्या प्रकरणात अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियाेग चालवण्याच्या तयारीला वेग आला आहे. ट्रम्प यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही महाभियाेग चालवण्यासाठी पुढचे पाऊल टाकू, असे सभापती नॅन्सी पॅलाेसी यांनी स्पष्ट केले. साेमवारी डेमाेक्रॅट सभागृहात बंडखाेरांना चिथावणीच्या आराेपाबाबतचा प्रस्ताव मांडतील. कॅपिटल हिलनंतर आता २० जानेवारीला हाेऊ घातलेल्या शपथ समारंभावर देखील हिंसाचाराचे सावट आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार विविध हेट ग्रुप व साेशल मीडियावरील पाेस्टमधून अशा प्रकारचे संकेत मिळाले आहेत. ट्रम्प समर्थक शपथ ग्रहण समारंभात हिंसाचार घडवू शकतात. ट्रम्प नाहीतर युद्ध. तुम्ही गाेळी चालवू शकत नसल्यास आता तुम्ही शिकले पाहिजे. अशा आशयाच्या पाेस्ट ट्रम्प समर्थक साेशल मीडियावर टाकू लागले आहेत. आम्ही सरकारी इमारतींवर वादळ धडकवू, पाेलिसांना ठार करू, फेडरल कर्मचारी, एजंटांची हत्या करू, आम्ही फेर मतमाेजणीची मागणी करत आहाेत, असे एका समर्थकाने पाेस्ट केले. आॅनलाइन पाेस्ट व ट्रम्प समर्थकांचा दृष्टिकाेन पाहून तज्ञांनी देखील हिंसाचाराबद्दल इशारा दिला आहे.

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रद्द, अॅपलचा इशारा
ट्विटरने ट्रम्प यांच्या पर्सनल अकाउंटला कायमस्वरूपी रद्द केले आहे. भविष्यातील हिंसाचाराचा धाेका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या अकाउंटमधून झालेल्या ट्विट्सचा आढावा घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. गुगलने अमेरिकन मायक्राेब्लाॅगिंग व साेशल नेटवर्किंग सर्व्हिस पार्लरला प्ले स्टाेअरवरून हटवले. अॅपलने पार्करला २४ तासांचा इशारा दिला. पार्कर प्लॅटफाॅर्मवर ट्रम्प समर्थक, कट्टरवाद्यांची संख्या जास्त आहे. त्यावर सातत्याने चिथावणीखाेर चर्चा हाेत हाेत्या.

शपथ समारंभात न येणे चांगले : जो बायडेन
नवनिर्वाचित अध्यक्ष जाे बायडेन म्हणाले, ट्रम्प शपथ समारंभात सहभागी झाले नाही तर चांगेल हाेईल. त्यांनी जगासमाेर अमेरिकेची मान खाली घातली आहे. आता ते अध्यक्षांच्या कार्यालयास लायक राहिलेले नाहीत. तत्पूर्वी ट्रम्प यांनी शपथ ग्रहणास सहभागी हाेणार नसल्याचे शुक्रवारी जाहीर केले हाेते. समारंभातही गोंधळाची भीती निर्माण झाली आहे.

सभापती नॅन्सी पॅलाेसी यांच्या कार्यालयात त्यांच्या टेबलवर पाय ठेवून छायाचित्र काढणारा व ताेडफाेड करणाऱ्यास अटक झाली आहे. रिचर्ड बर्नेट नावाच्या व्यक्तीला अर्कांसाच्या बेंटोबिलेमधून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...