आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (लोअर हाऊस) मध्ये संमत झाला. ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती बनले आहेत, ज्यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रक्रिया होणार आहे. त्यांच्यावर देशाविरूद्ध भडकावल्याचा आरोप आहे. रिपब्लिकनच्या काही सभासदांनीही ट्रम्पच्या महाभियोगाच्या बाजूने मतदान केले आहे.
खालच्या सभागृहात महाभियोग चालवण्याचा ठराव पूर्ण बहुमताने मंजूर झाला. CNN नुसार, महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने 232 तर विरोधात 197 मतदान झाले. ट्रम्प दंगली भडकावल्याचे आरोप असल्याचे प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांचे म्हणणे आहे. अगदी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या 10 खासदारांनीही त्यांच्या विरोधात मतदान केले आहे.
Majority of US House votes to impeach US President Donald Trump: AFP news agency https://t.co/C90g8ygIm1
— ANI (@ANI) January 13, 2021
हा ठराव संमत होण्यापूर्वी ट्रम्प यांनी लोकांना आवाहन केले की यापुढे हिंसाचार होऊ नये. कायदाभंग किंवा कोणत्याही प्रकारची तोडफोड होऊ नये. तणाव कमी करण्याचे आणि वातावरण शांत करण्याचे मी अमेरिकन नागरिकांना आवाहन करतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.