आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Impeachment Trial Over Trump | Capitol Violence, January 6 Capitol Violence, Donald Trump, Republican Senators

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाभियोगातून दुसऱ्यांदा सुटले ट्रम्प:अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात ठराव नामंजूर, माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले- मी नेहमीच कायद्याच्या राजवटीचा चॅम्पियन होतो आणि राहील!

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाभियोगासाठी आवश्यक होती 67, मिळाली 57 मते

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शनिवारी झालेल्या दुसर्‍या महाभियोग खटल्यात निर्दोष सोडण्यात आले आहे. 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसेंवरून झालेल्या महाभियोग प्रक्रियामध्ये 4 दिवसांच्या वादानंतर सीनेटमध्ये मतदान झाले, ज्यामध्ये 57 सदस्यांनी त्यांना हिंसा भडकावण्यासाठी दोषी मानले, तर 43 सदस्य याच्या विरोधात होते. त्यामुळे ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले नाही.

ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षावर निशाणा साधला

महाभियोगातून मुक्तता झाल्यानंतर ट्रम्प यांनी नाव न घेता डेमोक्रॅट पक्षावर निशाणा साधला. ट्रम्प म्हणाले की, ''अमेरिकेतील एक पक्ष कायद्याच्या राजकारणाला कलंकित करण्यासाठी मोफत पास वाटप करीत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचा (कायदा अंमलबजावणी) अपमान केला जात आहे. जमावाला भडकवले आणि दंगलखोरांना माफक केले जात आहे. राजकीय बदला घेण्यासाठी न्यायालयीन यंत्रणेचा उपयोग केला जात आहे. जे लोक त्यांच्याशी सहमत नाहीत, त्यांच्यावर दबाव टाकला जात किंवा त्यांना ब्लॅकलिस्ट केले जात आहे.''

ट्रम्प म्हणाले की, ''मी नेहमीच कायद्याच्या राजवटीचा चॅम्पियन होतो आणि राहील. कोणत्याही द्वेषविना अमेरिकन लोकांचे हक्क शांततेत व आदराने वाढविले जातील.'

महाभियोगासाठी आवश्यक होती 67 मते

100 सदस्यीय सीनेटमध्ये डेमोक्रेट खासदारांची संख्या 50 आहे आणि ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयंश बहुमताची (67) आवश्यकता होती. ट्रम्पविरोधात 57 मते पडली. 7 रिपब्लिकन खासदारांनी (ट्रम्प यांचा पक्ष) देखील ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले. असे असूनही ट्रम्प महाभियोगापासून वाचले. ज्या 7 रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या पक्षात मतदान केले त्यामध्ये बिल कॅसिडी, रिचर्ड बर्र, मिट रोमनी, सुजैन कॉलिन्स, लीजा मरकॉस्की, बेन सैस आणि पॅट टूमी यांचा समावेश आहे.​​​​​​​​​​​​​​

गेल्यावर्षीही आणला होता महाभियोग प्रस्ताव

ट्रम्प यांच्याविरोधात गेल्या वर्षी महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. संसदेच्या खालच्या सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (एचओआर) मधील बहुसंख्य डेमोक्रॅटमुळे तो पारित झाला होता, मात्र परंतु सिनेटमधील बहुसंख्य रिपब्लिकन लोकांमुळे हा प्रस्ताव रद्द झाला. बिडेन यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप होता. तसेच वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्यांनी 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या पक्षासाठी युक्रेनकडून मदत मागितली होती.

बातम्या आणखी आहेत...