आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात जेमतेम दीड महिन्यापूर्वी सत्तेवर आलेले शाहबाज शरीफ सरकार व माजी पंतप्रधान इम्रान खान आमने-सामने आहेत. इम्रान यांनी आपली ब्रिगेड म्हणजे कार्यकर्त्यांना लाँग मार्च हल्लाबोल करण्यासाठी इस्लामाबादला रवाना केले. लवकरात लवकर निवडणूक घ्यावी या मुद्द्यावर इम्रान अडून आहेत. शाहबाज यांनी ही मागणी फेटाळली. काहीही झाले तरी इम्रान ब्रिगेडला इस्लामाबादमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, याचा चोख बंदोबस्त शाहबाज यांनी केला आहे. पाक संसद, पंतप्रधान निवास आणि इस्लामाबादेतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी रेड झोनच्या सुरक्षा दलाकडे सोपवली. महिनाभरासाठी कलम १४४ लागू केले. त्यातच सोमवारी रात्री सिंध व पंजाबमधील पीटीआय नेत्यांवर छापेही टाकण्यात आले.
गृहमंत्री म्हणाले, इम्रान यांचा अराजक पसरवण्याचा कट
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले, इम्रान खान देशात अराजक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसा त्यांचा कट आहे. पीएमएलएनचे नेते अताउल्ला तरार ‘भास्कर’ला म्हणाले, लाँग मार्चच्या आडून इम्रान खान पाकिस्तानला कमकुवत करू शकत नाहीत. कायद्याने हे चुकीचे आहे.
इम्रान यांचा दावा खरा, सरकार खोटे : अस्करी
पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक हसन अस्करी म्हणाले, सरकारने लाँग मार्चवर बंदी घातल्याने देशात अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान यांची खेळी वास्तवात येत आहे. सरकार संकटात आहे. इम्रान यांच्या सरकारविषयीच्या नरेटिव्हला जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
लाँग मार्च काढणारच, सरकार रोखू शकणार नाही : इम्रान
माजी पंतप्रधान इम्रान खान मंगळवारी पेशावरमध्ये म्हणाले, लाँग मार्च निघणार आहे. शाहबाज सरकार त्याला रोखू शकणार नाही. हा पाकिस्तानच्या भविष्याचा प्रश्न आहे. पाकच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा असेल, असा दावा त्यांनी केला. शाहबाज सरकारचे वागणे फॅसिस्ट व लष्करशहांच्या कृतीसारखे आहे. जनता तटस्थ असलेल्या न्यायसंस्था, लष्कर, नोकरशहा यासारख्या संस्थांचे काम पाहत आहे. देशाची परिस्थिती पाहता या संस्थांनी तटस्थ राहणे मुळीच योग्य नाही. सरकार पीटीआय कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांची धरपकड करत आहे. महिला व मुलांनाही त्रास दिला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.