आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Accuses India And RAW For Bomb Blast Outside Hafiz Saeed House In Lahore; News And Live Updates

पाकिस्तानचा निराधार आरोप:हाफिज सईदच्या घरावर झालेल्या हल्ल्यात भारताचा हात - पंतप्रधान इम्रान खान; मास्टरमाइंड 'रॉ'चा एजंट - पाक एनएसएचा दावा

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 जून रोजी झाला होता स्फोट

दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देण्याच्या कारणावरुन पाकिस्तानावर नेहमीच टीकेची झोड उठवली जाते. परंतु, पाकिस्तानाने भारतावर नुकतेच बिनबुडाचे व निराधार आरोप केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोट हल्यासाठी भारताला दोषी ठरवले आहे. या जबरदस्त हल्ल्यामागील संपूर्ण नियोजन आणि वित्तपुरवठा भारताने केला असल्याचा दावा त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्गाने या वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

तर दुसरीकडे या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय रॉ एजंट असल्याचा दावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मोईद युसुफ यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, 23 जून रोजी झालेल्या या हल्ल्याबरोबरच अनेक सायबर हल्लेही यावेळी करण्यात आले होते. तपासात अडथळा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे युसुफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या हवाल्याने सांगितले.

23 जून रोजी झाला होता स्फोट

  • पाकिस्तानच्या लाहोरमधील जौहर शहरात 23 जून रोजी स्फोट झाला होता. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू आणि 17 लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, हा हल्ला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईद याच्या घराजवळ करण्यात आला होता. परंतु, हाफिज सईद सध्या तुरूंगात आहे.
  • लाहोर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या भीषण स्फोटात सुमारे 30 किलो स्फोटके वापरली गेली. यामध्ये परदेशात बनवलेल्या वस्तूंचा वापरही केला गेला असल्याचे ते म्हणाले. या स्फोटामुळे घटनास्थळावर तीन फूट खोल व 8 फूट रुंद खड्ड तयार झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...