आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Imran Khan And Narendra Modi News And Updates | Pakistan PM Imran Khan In Sri Lanka Says On His Relationship With India Over Kashmir Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी पंतप्रधानांचा खुलासा:पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला होता- इम्रान खान

कोलंबो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानकडून श्रीलंकेवर भारताच्या दबावचा आरोप

दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत असलेल्या नात्यावर एक नवीन खुलासा केला आहे. बुधवारी इम्रान खान म्हणाले की, ‘मी सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला होता. मी मोदींना म्हणालो की, आपल्या देशातील जे मुद्दे आहेत, त्यांना चर्चेतून सोडवता येईल. पण, यात यश आले नाही.’ इम्रान यांनी आशा व्यक्त केली आहे की, येणाऱ्या काळात हे मुद्दे सोडवले जातील. यावेळी त्यांनी काश्मीरचाही उल्लेख केला.

फ्रांस आणि जर्मनीचे उदाहरण

कोलंबोमध्ये ट्रेड अँड इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान म्हणाले की- जर्मनी आणि फ्रांसमध्ये अनेकदा वाद झाले. आज तुम्ही तेव्हांच्या परिस्थितीचा विचारदेखील करू शकत नाही. पण, ते व्यापारामुळे परत एकत्र आले. अशाच प्रकारचे माझे स्वप्न आहे की, उपमहाद्वीपमधील मतभेद आणि वाद संपावे. काश्मीर वाद आम्हाला UN सिक्योरिटी काउंसिलच्या रिजॉल्यूशन्सच्या पद्धतीने सोडवावा लागेल. यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे चर्चा.

भारताच्या दबावचा आरोप

पाकिस्तानच्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, श्रीलंकाने भारताच्या नाराजीमुळे आणि दबावामुळे इम्रान खान यांच्या शेड्यूलमध्ये बदल केले होते. याप्रकारच्या बातम्या श्रीलंकन मीडियामध्येही आल्या होत्या. कोलंबो गॅजेटीने सोमवारी आपल्या आर्टिकलमध्ये लिहीले होते- कोविड-19 दरम्यान भारताने श्रीलंकेला खूप मदत केली. जेव्हा व्हॅक्सीन तयार झाले, तेव्हा भारताने पाच लाख व्हॅक्सीन गिफ्ट केले. श्रीलंका कोणत्याही परिस्थितीत भारताला नाराज करू इच्छित नाही.

बातम्या आणखी आहेत...