आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या प्याद्याने केला खानचा विश्वासघात:एका मंत्र्याने इम्रान खानचे फोनवरील बोलणे रेकॉर्ड केले, ते काही वेळात लष्करप्रमुखांपर्यंत पोहोचवलं अन् सरकार धोक्यात आलं

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात त्याच पक्षाचे सरकार बनते, ज्याला बलाढ्य लष्कराचा पाठिंबा असतो. एखादे सरकार स्थापन झाले, तरी ते जोपर्यंत लष्कर आनंदी असेल तोपर्यंतच चालू शकते. कधी ना कधी लष्कराचा सरकारवर राग येतो आणि परिणामी सरकार पडते. या गोष्टी सिद्ध करण्यासाठी फक्त एक उदाहरण पुरेसे आहे. ते म्हणजे पाकिस्तानचे कोणतेही निर्वाचित सरकार आजवर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. इम्रानलाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांची खेळी मोठ्या चतुराईने उधळून लावली आहे. आता नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्यानंतर, निवडणुकीपर्यंत ते एकमेव काळजीवाहू पंतप्रधान असतील. इम्रान खान यांना त्यांच्याच एका मंत्र्याने धोका दिल्याने पाकिस्तानात संपूर्ण राजकीय गदारोळ निर्माण झाल्याचे म्हटलं जातं आहे. एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारीमध्ये एके दिवशी इम्रान कारमध्ये लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याबद्दल बोलत होते. त्यांच्या जवळच्या मंत्र्याने त्यांची रेकॉर्डिग केली. काही मिनिटांनंतर हे कॉल रेकॉर्डिंग जनरल बाजवा यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर इम्रान सरकारचा खेळ संपला.

शेख रशीद स्वतःला लाल हवेलीचा बादशाह म्हणवतात. ते लष्कराच्या अगदी जवळ असून रावळपिंडीच्या आलिशान लाल हवेलीत राहतात.
शेख रशीद स्वतःला लाल हवेलीचा बादशाह म्हणवतात. ते लष्कराच्या अगदी जवळ असून रावळपिंडीच्या आलिशान लाल हवेलीत राहतात.

कोणत्या मंत्र्याने खेळ खराब केला -
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार जफर अब्बास नक्वी यांच्या म्हणण्यानुसार, देशात वाईट परिस्थिती असतानाही एकवेळेस लष्करप्रमुख बाजवा यांनी इम्रान खान सरकारचे अपयश स्वीकारले असते. पण, गृहमंत्री शेख रशीद यांनी इम्रान यांना धोका दिला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजवा आणि इम्रान यांच्यात दुरावा आला होता. आयएसआयचे तत्कालीन प्रमुख जनरल फैज हमीद यांची पेशावरला बदली होऊ नये, अशी इम्रानची इच्छा होती. कारण इम्रान यांना सत्तेवर आणण्यात फैज आणि बाजवा यांची सर्वात महत्त्वाची भूमिका होती. हमीद यांनी 155 जागांच्या अल्पमतात 179 च्या बहुमतासह सरकारचे नेतृत्व केले होते. नंतर इम्रानने बाजवा यांना तीन वर्षांची मुदतवाढ देऊन उपकाराची परतफेड केली. मात्र, फैज यांची बदली थांबवून इम्रान आणि बाजवा आमने-सामने आले.

तर नेमके झाले काय?
जफरच्या म्हणण्यानुसार ही घटना फेब्रुवारीमधली आहे. त्यावेळी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या विरोधी आघाडीने पत्रकार परिषदेत सरकारविरोधात लवकरच अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे स्पष्ट केले होते. 2021 मध्ये एकदा इम्रान खानच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. पण, लष्कराच्या मदतीने त्यांनी सरकार वाचवलं. मात्र, यावेळेस ते चितेंत पडले होते.

इम्रान आणि शेख रशीद एकाच गाडीतून बनीगाला (इमरानच्या घरी) जात होते. यादरम्यान कोणाचा तरी फोन आला आणि इम्रान समोरच्या व्यक्तीशी अनेक विषयांवर बोलू लागले. यावेळी लष्कर आणि जनरल बाजवा यांचाही उल्लेख झाला. इम्रानने काही गोष्टी सांगितल्या, ज्या लष्कर आणि बाजवा यांच्या विरोधात होत्या. शेख रशीद यांनी या गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि नंतर जनरल बाजवा यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यानंतर काही वेळातच लष्कराने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच इम्रान यांचे सरकार आता जास्त दिवस चालणार नाही, हे निश्चित झाले होते. तर दुसरीकडे विरोधक आणि जनताही दबाव निर्माण करत होती. नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांनी इम्रानमागे लष्कराचा हात असल्याचे उघडपणे सांगितले होते. त्यामुळे लष्कराची बदनामी होत होती.

शेख रशीद यांचा इम्रान मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी लष्कराने त्यांच्यावर दबाव टाकल्याचे बोलले जाते. सरकारची गुपते लष्करापर्यंत पोहचावती, हा त्याचा उद्देश होता आणि रशीद लष्कराच्या सांगण्याप्रमाणेच वागतं.
शेख रशीद यांचा इम्रान मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी लष्कराने त्यांच्यावर दबाव टाकल्याचे बोलले जाते. सरकारची गुपते लष्करापर्यंत पोहचावती, हा त्याचा उद्देश होता आणि रशीद लष्कराच्या सांगण्याप्रमाणेच वागतं.

'मी रशीदलाही नोकर म्हणूनही ठेवणार नाही -
रशीदबद्दल नेहमीच असे बोलले जाते की, देशात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण रशीद मंत्री नक्कीच होतील.रशीद सैन्याचे प्यादे असल्याचेही म्हटलं जातं. तर एकदा मे 2008 मध्ये टीव्ही डिबेटदरम्यान इम्रान आणि शेख रशीद समोरासमोर आले होते. चर्चेत इम्रान खा यांना प्रश्न विचारण्यात आला, की जर यावेळी तुमचे सरकार बनले तर शेख रशीद यांना त्यांच्या पक्षात मंत्री केले जाईल का? यावर मी त्याला माझा नोकर म्हणूनही ठेवणार नाही, असे इम्रान म्हणाले होते. पण, सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांच्या सरकारमध्ये रशीद आधी रेल्वेमंत्री झाले आणि आता गृहमंत्री आहेत.

बातम्या आणखी आहेत...