आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याला अनेक वर्षे लोटली. पण पाकच्या राजकारणात कोणताही बदल झाला नाही. पाकच्या एकाही पंतप्रधानाला आतापर्यंत 5 वर्षांची कारकिर्द पूर्ण करता आली नाही. इम्रान यांनाही ते जमले नाही. त्यांना अवघ्या पाऊणे 4 वर्षांतच आपली खूर्ची सोडावी लागली.
पाक क्रिकेट संघाची यशस्वीपणे धूरा वाहणाऱ्या इम्रान यांचा अपयशी पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. कधीकाळी प्लेबॉयची इमेज असणाऱ्या इम्रान यांच्या हातात सध्या सर्वत्र जपमाळ दिसते. चला तर मग पाहुया पाक लष्कराने बेड्या ठोकलेल्या इम्रान यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटना व घडामोडींची माहिती...
3 विवाह, पण प्रत्येक लग्नासोबत प्रतिमा मलिन
पाकिस्तानात इम्रान यांची प्रतिमा एखाद्या प्लेबॉय सारखी होती. 1995 मध्ये वयाच्या 43 व्या वर्षी त्यांनी यहुदी महिला जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी निकाह केला. पण, हे लग्न फारकाळ टिकले नाही. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानतंर 2015 मध्ये त्यांनी पत्रकार रेहम खान यांच्याशी लग्न केले. हे लग्नही केवळ वर्षभर टिकेल. त्यानंतर पंतप्रधान बनण्यापूर्वी 2018 मध्ये त्यांनी बुशरा बीबी यांच्याशी तिसरा निकाह केला.
इम्रान यांच्या प्रत्येक लग्नावेळी वाद झाला. त्यांच्या दुसरी पत्नी रेहम खान यांनी एका पुस्तकाद्वारे त्यांची अनेक गुपिते उघड केली. त्यांना समलैंगिक म्हटले. तिसरी पत्नी बुशरा बीबीने त्यांना तोटक्यांत अडकवून बदनाम केले. ब्रिटनमध्ये त्यांची आणखी एक मुलगी असल्याची बातमीही शेवटी उजेडात आली. आरजू काझमी यांच्यासह अनेक पत्रकारांनी इम्रान मादक पदार्थांच्या आहारी गेल्याचे संकेत दिलेत.
यशस्वी क्रिकेटर ते अपयशी पंतप्रधानपाकमध्ये विविध अडचणींचा सामना करणारे इम्रान खान यांचा यशस्वी क्रिकेटर ते अपयशी पंतप्रधानापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. 1992 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणे व 1996 मध्ये पाकिस्तान तहरिक ए इंसाफ या पक्षाची स्थापना या त्यांच्या जिवनातील दोन ठळक घटना आहेत. या घटना त्यांच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्या.
पहिल्या निवडणुकीत मानहाणीकारक पराभव
इम्रान यांनी पीटीआयची स्थापन केली तेव्हा त्यांचा राजकारणाशी दूरवर संबंध नव्हता. एवढेच नाहीतर तोपर्यंत त्यांनी मतदानही केले नव्हते. 1996 मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी अवघ्या 7 जागा लढवल्या. या सर्वच जागांवर त्यांचा पराभव झाला. पण, हळूहळू इम्रान यांचा राजकीय अनुभव व पक्ष कार्यकर्ते दोन्हीही वाढले.
नवाज यांच्या तख्तापालटाचे समर्थन व मुशर्रफ यांचा विरोध
1999 च्या कारगिल युद्धात पराभव झाल्यानंतर जनरल परवेज मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा तख्तापालट केला. त्यावेळी इम्रान यांनी मुशर्रफ यांच्या कृतीचे जोरदार समर्थन केले. पण, 2002 उजाडल्यानंतर ते मुशर्रफ यांचे विरोधक बनले. त्याचवर्षी इम्रान यांच्या पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकले होते. पण, त्यावेळी त्यांना 272 पैकी अवघी 1 जागा मिळाली होती.
मुशर्रफ यांच्या फाशीची मागणी
मुशर्रफ यांनी 3 नोव्हेबंर 2007 रोजी पाकिस्तानात आणीबाणी घोषित केली. तेव्हा इम्रान यांनी त्यांना फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना नजरकैदेत डांबण्यात आले. पण, तेथून ते अचानक फरार झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा गाझी खान तुरुंगात बंदिस्त करण्यात आले. पण, 21 नोव्हेंबर रोजी अन्य राजकीय कैद्यांसोबत त्यांचीही सुटका करण्यात आली.
झरदारींनी नजरकैदेत डांबले, इम्रान यांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले
पीटीआयने 2008 च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात मोर्चा सांभाळला. 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी त्यांना नजरकैदेत डांबले. 2013 मध्ये इम्रान यांनी पीपीपीचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. तसेच पाक-अफगाण सीमेवर होणाऱ्या अमेरिकन ड्रोन हल्ल्यांना कडाडून विरोध केला.
या काळात पाकच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू होती. सरकार अस्थिर झाले होते. यामुळे इम्रान यांचा राजकीय आलेख उंचावण्यास मदत झाली. महागाई व भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने इम्रान यांना अक्षरशः डोक्यावर घेतले.
लष्करासोबतचे मतभेद महाग पडले
इम्रान यांना सत्तेत आणण्यात पाक लष्कराचा मोठा हात आहे. लष्कराने त्यांना झरदारी व शरीफ यांच्याविरोधात मोठे केले. इम्रान जेव्हा केव्हा संकटात सापडले तेव्हा जनरल बाजवा व आयएसआय प्रमुखांन त्यांना तारले. पण, त्यानंतर त्यांनी देशाची सूत्रे एकहाती चालवण्याचा प्रयत्न केला. यावरुन त्यांचे लष्कराशी खटके उडाले. त्यानंतर लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सरकारचे पाकमध्ये जे होते तेच झाले. लष्कराने विरोधकांच्या अविश्वास ठरावावेळी कथित तटस्थ भूमिका घेऊन एकप्रकारे इम्रान यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली. यामुळे इम्रान यांना आपल्या सरकारवर पाणी सोडावे लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.