आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची गृहयुद्धाकडे वाटचाल:सर्वात मोठे राज्य पंजाब आता लष्कराच्या ताब्यात, प्रत्येक शहरात हिंसाचार-जाळपोळ; पाहा, 15 फोटो

इस्लामाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 9 मे रोजी दुपारी 3 वाजता अटक करण्यात आली होती. अल-कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानी रेंजर्सनी एनएबीच्या आदेशानुसार ही अटक केली. पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, अल कादिर ट्रस्ट घोटाळा 50 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे आणि इम्रान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि बुशरा यांची मैत्रीण फराह गोगी यांनी त्याचा फायदा घेतला.

अटकेपूर्वी इम्रान यांनी 2 प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकेनंतर पीटीआय कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'नुसार - हिंसाचार पाहता संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये निमलष्करी दलाच्या रेंजर्स तैनात करण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, इम्रानच्या कायदेशीर टीमला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. इम्रान खान यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद येथील पोलिस मुख्यालयात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. सुनावणी सुरू होण्यापूर्वीच येथे लष्कर तैनात करण्यात आले होते. पोलिस लाईनमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. एनएबीने इम्रान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली आहे.

इम्रान मंगळवारी कोर्टात पोहोचल्यापासून त्यांना अटक होईपर्यंत आणि त्यानंतर आंदोलनाचे 15 महत्त्वाचे फोटो पाहा…

हे छायाचित्र 9 मे चे आहे, जेव्हा इम्रान खान दोन खटल्यांमध्ये जामिनासाठी इस्लामाबाद हायकोर्टात कडेकोट बंदोबस्तात जात होते.

या छायाचित्रात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात जाताना दिसत आहेत.

हे छायाचित्र खान यांच्या अटकेपूर्वीचे आहे. इस्लामाबाद कोर्टात बसून ते बाहेरचे वातावरण पाहत होते.

हे छायाचित्र इम्रान खान यांच्या जखमी वकिलाचे आहे. इम्रान आणि त्यांच्या वकिलाला कोर्टाबाहेर मारहाण केल्याचा आरोप पीटीआयने केला आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

कोर्टाबाहेर पीटीआय कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला.

इम्रान यांच्या अटकेविरोधात त्यांच्या समर्थकांनी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली.

पाकिस्तानातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते सातत्याने रॅली काढत आहेत. त्यामुळे खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

छायाचित्रात पोलिस जळालेल्या दुकानाबाहेर दिसत आहेत. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी हे दुकान पेटवून दिले होते.

इम्रान यांच्या समर्थकांनी अनेक बस आणि कारही पेटवून दिल्या. इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये आंदोलनादरम्यान पीटीआय कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी कराचीमध्ये आंदोलनादरम्यान पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिस व्हॅन पेटवली.

पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी कराचीमध्ये निमलष्करी दलाच्या चौकीला आग लावली. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

इम्रान यांच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद पोलिस मुख्यालयात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. पोलिस लाईनच्या बाहेर लष्कर तैनात करण्यात आले होते.

बुधवारी नॅबच्या न्यायाधीशांसमोर इम्रान यांच्या खटल्याची सुनावणी सुरू असतानाचे त्यांचे हे छायाचित्र समोर आले.