आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तोशाखाना प्रकरणात जारी करण्यात आलेला अटक वॉरंट रद्द करण्यास इस्लामाबाद कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
इस्लामाबाद कोर्टाने गत आठवड्यातच इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर रविवारी पोलिस त्यांना अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. पण इम्रान घरी न आढळल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.
इम्रान म्हणाले होते - माझी हत्या होण्याची शक्यता
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना स्वतःच्या हत्येची भीती वाटत आहे. यासंबंधी त्यांनी थेट पाकच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. त्यात इम्रान यांनी पेशीसाठी न्यायालयात हजर राहताना चोख सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करवून देण्याची मागणी केली आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूनने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. इम्रान CJI ला लिहिलेल्या पत्रात म्हणाले - मी एका अत्यंत गंभीर मुद्याकडे लक्ष वेधत आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेत. यासंबंधी मला धमक्याही मिळत आहेत. आता मला माझी हत्या होण्याची भीती वाटत आहे.
इम्रान यांना रविवारी झाली नाही अटक
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखान प्रकरणात अटक वॉरंट जारी केल्यानंतरही पोलिसांना पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना रविवारी अटक करता आली नाही. त्यांच्या अटकेचे नाट्य अनेक तास चालले. त्यात इम्रान आपल्या घरी हजर नसल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाची नोटीसही इम्रान यांच्या स्टाफने रिसीव्ह केली.
अनेक तासानंतर पोलिस इम्रान खान यांच्या घराबाहेर पडली. त्यानंतर त्यांनी सरकार, पोलिस, लष्कर व ISI सडकून टीका केली. दुसरीकडे, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान यांना आपली अटक टाळता येणार नाही असे म्हटले आहे. त्यांच्या अटकेसाठी स्पेशल कमांडो फोर्स तयार आहे.
इम्रान खान काय करत आहेत
अटक टाळण्यासाठी इम्रान खान आपल्या समर्थकांसह लाहोरच्या जमान पार्क या आपल्या घरी दडले आहेत. त्यांच्या घराबाहेर शेकडोंची गर्दी आहे. जमानच्या बाहेर 4 रस्ते आहेत. त्या चारही रस्त्यांवर लाठ्याकाठ्या घेऊन त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. या लोकांना अन्नपाणी उपलब्ध करवून दिले जात आहे.
इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी जेल भरो आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणी त्यांच्या पक्षाचे अनेक नेते तुरुंगात आहेत. पण इम्रान स्वतः तुरुंगात जाण्यास घाबरत आहेत. यासाठी त्यांनी सर्वच उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सरकार व पोलिस तयार
‘जियो न्यूज’च्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी इस्लामाबाद पोलिसांचे केवळ 10 जवान इम्रान यांच्या घरी गेले. त्यांचा हेतू इम्रान यांना अटक करण्याचा नव्हता. ते केवळ तिथे इम्रान यांचे किती समर्थक उपस्थित आहेत व त्यांच्याकडे कोणती शस्त्रे आहेत हे पाहण्यासाठी गेले होते.
या वृत्तानुसार, रेंजर्स व पोलिसांचे एक स्पेशल कमांडो पथक कोणत्याही वेळी मोहीम राबवून इम्रान यांना अटक करेल. या पथकात महिला पोलिसांचाही समावेश आहे. इम्रान अटक टाळण्यासाठी या महिला व मुलांची मानवी ढाल बनवण्याची शक्यता आहे.
जमान पार्कला जाणाऱ्या चारही रस्त्यांवर कॅमेऱ्यांतून निगराणी ठेवली जात आहे. इम्रान यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना रस्त्यातच अटक केली जाईल. त्यांना पकडण्यात आले तर सर्वप्रथम एखाद्या मोठी सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातील. त्यानंतर तपास यंत्रणा त्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्यांना इस्लामाबाद कोर्टात दाखल केले जाईल.
रविवारी काय घडले
पोलिस रविवारी तोशाखाना प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. इस्लामाबाद पोलिसांनी एका ट्विटद्वारे सांगितले की, एसपी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा इम्रान तिथे उपस्थिति नव्हते.
काही तासांनंतर इम्रान खान यानी लाहोर येथील आपल्या समर्थकांना संबोधित केले. ते म्हणाले - पाकिस्तान एवढा लज्जास्पद केव्हाच झाला नाही. आपले क्राइम मिनिस्टर (पंतप्रधान शाहबाज शरीफ) भीक मागत फिरत आहेत. माझे समर्थक वाघ आहेत. मी केव्हाच कुणापुढे झुकणार नाही. आम्ही केवळ अल्लाहपुढे झुकणारे लोक आहेत. शाहबाज यांना 16 अब्ज रुपयांच्या घोटाळ्यात शिक्षा होणार होती. जनरल बाजवा यांनी त्यांना पंतप्रधान केले. गृहमंत्र्यांनी 8 खून केले. ते खूप मोठे चोर आहेत.
ते म्हणाले - नवाज शरीफ लंडनहून सुत्रे हलवत आहेत. हे लोक आमच्या नशिबाचा फैसला करत आहेत. भारतीय वृत्तवाहिन्या आपली थट्टा उडवत आहेत. इम्रान यांनी आपल्या भाषणात जनतेला जिहाद करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ISI चे काही अधिकारी हैवान झालेत. ते माझ्या सुरक्षेचा दाखला देतात. पण तेच माझ्या जीवावर उठलेत.
7 मार्च रोजी इस्लामाबाद कोर्टात पेशी
इम्रान यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी सांगितले होते- आम्ही येथे त्यांच्या अटकेसाठी आलो नाही. त्यांना अटक करायची असती, तर आम्हाला जगातील कोणत्याही ताकदीला अडवता आले नसते. इम्रान आम्हाला आढळले नाही. आम्ही त्यांना 7 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ती माजी परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांना सुपूर्द केली आहे. इम्रान अटक टाळण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत.
इम्रान यांना 7 मार्च रोजी इस्लामाबाद न्यायालयात हजर होणार आहेत. पाकिस्तान-तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) चे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी म्हणाले – पोलिस नोटिसमध्ये इम्रान यांच्या अटकेचा उल्लेख नाही. इम्रान आपल्या कायदेशीर सल्लागारांसोबत बैठक घेणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या पुढील रणनीतीबद्दल सांगतील.
मोठा प्रश्न : इम्रान खान यांना अटक होणार?
इम्रान खान यांना रविवारी अटक झाली नसली तरी, त्याने त्यांच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. इस्लामाबाद पोलिस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराबाहेर हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. त्यानंतर एसपी तारिक बशीर नोटीस घेऊन इम्रान यांच्या घरात गेले तेव्हा त्यांना इम्रान घरी नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिस परतल्यानंतर इम्रान घराबाहेर आले. त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. त्यांनी त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख क्राइम मिनिस्टर म्हणून केला. तर इतर नेत्यांना चोर, डाकू, दरोडेखोर व गुंड म्हटले. लष्कर व आयएसआयला त्यांनी थेट आव्हान दिले. आता न्यायालय त्यांच्याभोवतीचा फास अधिक घट्ट करेल.
दोन प्रकरणे उद्भवतात.
एक- समर्थकांना भडकावून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे.
दोन- मी घरी नव्हतो, असे खोटे बोलणे.
इम्रान यांनी 7 मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे आश्वासन दिले आहे. पण कोर्टाची त्यांना अटक करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही वेळी किंवा रात्री उशिरा अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडिया हा करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.