आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना झालेल्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना पाक सरन्यायाधीश उमर अता बांदियाल म्हणाले - इम्रान खान यांना एका तासात आमच्यापुढे हजर करा. तुम्ही एखाद्याला कोर्टातून कसे उचलू शकता? हा न्यायालयाचा अवमान आहे. उर्वरित प्रकरणावर नंतर सुनावणी होईल.
दुसरीकडे, त्याचवेळी, पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, सिंध प्रांत वगळता पंजाब, खैबर पख्तूनख्वा व बलुचिस्तानात लष्कर तैनात करण्यात आले आहे. पीटीआय नेते फवाद चौधरी यांना रात्री उशिरा व शाह महमूद कुरेशी यांना गुरुवारी सकाळी हिंसाचाराला खतपाणी घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत इम्रान यांच्या पक्षाच्या 1900 नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
9 मे रोजी इम्रान यांना अटक झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 290 लोक जखमी झालेत. बुधवारी इम्रान खान यांना 8 दिवसांची एनएबी कोठडी सुनावण्यात आली.
बिलावल म्हणाले - प्रकरण पुढे वाढवू नका PTI
कराचीत आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले - 9 मे हा पाकच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस आहे. कोणत्याही राजकारण्याला अटक होणे देशासाठी नुकसानकारक गोष्ट असते. पीटीआयने देशभरात सुरू असलेली हिंसक निदर्शने बंद करून कायद्याचे पालन केले पाहिजे. जे व्हायचे होते ते झाले. आता त्यांनी हे प्रकरण वाढवू नये. यामुळे त्यांच्याच अडचणींत भर पडेल.
गत 24 तासातील 6 मोठे अपडेट्स...
पाकिस्तानातील हिंसाचाराची 5 छायाचित्रे...
शाहबाज शरीफ यांच्या घरावर हल्ला
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, बुधवारी इम्रान खान यांच्या समर्थकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोरमधील घरावर हल्ला केला. 500 हून अधिक आंदोलकांनी शरीफ यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तसेच घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलकांनी तेथून पळ काढला. पाक सरकारने या हल्ल्याची अद्याप पुष्टी केली नाही.
काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस
सरकारच्या माहितीनुसार, इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भू माफिया मलिक रियाझला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. लंडनमध्ये त्याचे 40 अब्ज रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर हा पैसा ब्रिटिश सरकारने पाकला दिला. इम्रान यांनी माहिती मंत्रिमंडळालाही कळवली नाही.
त्यानंतर इम्रान यांनी अल कादिर ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टने धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठ स्थापन केले. यासाठी मलिक रियाझने कोट्यवधी रुपयांची जमीन दिली. तसेच बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्यामोबदल्यात रियाझ यांची सर्व प्रकरणे वगळण्यात आली. कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटेही त्यांना मिळाली.
गृहमंत्री राणा सनाउल्ला याप्रकरणी म्हणाले - यामुळे सरकारी तिजोरीला 60 अब्ज रुपयांचा फटका बसला. 13 महिन्यांत एकदाही इम्रान किंवा बुशरा चौकशीसाठी आले नाहीत. 4 वर्षांनंतरही या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.