आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचार:पाकच्या 4 पैकी 3 प्रांतात लष्कर; PTI नेते शाह मेहमूद कुरेशींसह फवाद चौधरींना बेड्या; इम्रान यांना 8 दिवसांची कोठडी

आंतरराष्ट्रीय डेस्क25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर हिंसाचाराची लाट उसळली आहे. पाकच्या राजधानीसह 3 प्रांतांत (पंजाब, खैबर पख्तूनख्वा व बलुचिस्तान) सैन्य तैनात करण्यात आले आहे. पीटीआय नेते शाह मेहमूद कुरेश व फवाद चौधरी यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पोलिसांनी आतापर्यंत इम्रानच्या पक्षाच्या 1900 नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

तत्पूर्वी बुधवारी इम्रान खान यांना 8 दिवसांची एनएबी (नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो) कोठडी ठोठावण्यात आली होती. पीटीआय समर्थकांनी पेशावरमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरही हल्ला केला. या हिंसाचारामुळे चांग भागातील आण्विक केंद्रावर कमांडो तैनात करण्यात आलेत. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. हिंसाचारावर लष्कराने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले- 9 मेच्या दिवसाकडे पाकच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून पाहिला जाईल.

हे फुटेज इस्लामाबादचे आहे. पाकच्या अनेक शहरांतून हिंसाचार व जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत.
हे फुटेज इस्लामाबादचे आहे. पाकच्या अनेक शहरांतून हिंसाचार व जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत.

गत 24 तासांतील 5 मोठे अपडेट्स...

  • इमरानच्या अटकेविरोधात लंडनमध्ये झालेल्या निदर्शनांवर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले - हे पाकचे अंतर्गत प्रकरण आहे. आमचे स्थितीवर लक्ष आहे.
  • पीएम शाहबाज शरीफ म्हणाले- इम्रान व पीटीआयने देशाचे मोठे नुकसान केले. दहशतवाद्यांप्रमाणे लष्करी तळांवर हल्ले केले. असे 75 वर्षात कधीच घडले नाही.
  • एनएबीच्या टेम्पररी न्यायालयात इम्रान यांची पेशी जाली. त्यात त्यांना 8 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. तोशाखाना प्रकरणातही माजी पाक पंतप्रधानांवर आरोप निश्चित करण्यात आलेत.
  • लष्कर म्हणाले - हे हल्ले एका सूनियोजित कटांतर्गत होत आहेत. लष्कराला देशद्रोही म्हटले जात आहे. आम्ही दोषींची ओळख पटवली आहे. काही जणांना गृहयुद्ध हवे आहे, त्यांना चोख प्रत्युत्तर दिल जाईल.
  • परदेशी दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशात इंटरनेट बंद आहे. शाळा व महाविद्यालयेही 2 दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.

पाकिस्तानातील हिंसाचाराची 5 छायाचित्रे...

लाहोरच्या कँट भागात इम्रान समर्थकांनी घर पेटवले.
लाहोरच्या कँट भागात इम्रान समर्थकांनी घर पेटवले.
कराचीमध्येही पीटीआय कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. यावेळी तिथे पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
कराचीमध्येही पीटीआय कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. यावेळी तिथे पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
या फोटोत आगीत जळालेल्या कारचे अवशेष हिंसाचारात दिसत आहेत.
या फोटोत आगीत जळालेल्या कारचे अवशेष हिंसाचारात दिसत आहेत.
पेशावरमध्ये पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
पेशावरमध्ये पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
लाहोरमध्ये इम्रान समर्थकांनी निदर्शनावेळी रास्ता रोको केला.
लाहोरमध्ये इम्रान समर्थकांनी निदर्शनावेळी रास्ता रोको केला.

शाहबाज शरीफांच्या लाहोर स्थित घरावर हल्ला
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी इम्रान खान यांच्या समर्थकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोर स्थित घरावर हल्ला केला. 500 हून अधिक आंदोलकांनी शरीफ यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तसेच घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहोचताच निदर्शकांनी तेथून पळ काढला. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला अद्याप दुजोरा दिला नाही.

पेशावरमध्ये इम्रानच्या समर्थकांनी पोलिसांवर असा हल्ला केला.
पेशावरमध्ये इम्रानच्या समर्थकांनी पोलिसांवर असा हल्ला केला.

काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस
सरकारच्या माहितीनुसार, इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भू माफिया मलिक रियाझला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. लंडनमध्ये त्याचे 40 अब्ज रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर हा पैसा ब्रिटिश सरकारने पाकला दिला. इम्रान यांनी माहिती मंत्रिमंडळालाही कळवली नाही.

त्यानंतर इम्रान यांनी अल कादिर ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टने धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठ स्थापन केले. यासाठी मलिक रियाझने कोट्यवधी रुपयांची जमीन दिली. तसेच बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्यामोबदल्यात रियाझ यांची सर्व प्रकरणे वगळण्यात आली. कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटेही त्यांना मिळाली.

गृहमंत्री राणा सनाउल्ला याप्रकरणी म्हणाले - यामुळे सरकारी तिजोरीला 60 अब्ज रुपयांचा फटका बसला. 13 महिन्यांत एकदाही इम्रान किंवा बुशरा चौकशीसाठी आले नाहीत. 4 वर्षांनंतरही या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थी आहेत.