आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण एका महिला न्यायाधीशाला धमकावण्याशी संबंधित आहे. याआधी खान यांच्याविरोधात 3 प्रकरणांमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापैकी एका प्रकरणात त्यांना तुरुंगात जाण्यापासून दिलासा मिळाला आहे.
सोमवारी, न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे- इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांना 29 मार्चला आमच्यासमोर हजर करा. गत वर्षी 20 ऑगस्ट रोजी इम्रान यांनी आपल्या विरोधात आदेश देणाऱ्या जेबा चौधरी यांना न्यायालयाच्या आवारात धमकी दिली होती.
हेलिकॉप्टरने घेऊन जाणार पोलिस
'जिओ न्यूज'च्या वृत्तानुसार, लाहोर पोलिसांचे एक पथक आणि रेंजर कमांडोंचे पथक इम्रान खान यांच्या लाहोरमधील 'जमान पार्क' येथील घरी पोहोचले आहे. आता केव्हाही पोलीस आणि रेंजर्सचे पथक खान यांच्या समर्थकांना पिटाळून लावून त्यांना अटक करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादला आणले जाईल.
काय म्हणाले न्यायाधीश?
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी आदेशात म्हटले - देशाच्या न्यायव्यवस्थेचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणी कितीही मोठा असो किंवा तो कोणत्याही पदावर असो, त्याने न्यायाधीशांना उघडपणे धमकावले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
तोशाखाना (सरकारी खजिन्यातील) भेटवस्तू नाममात्र किमतीत विकत घेऊन नंतर कोट्यवधी रुपयांना विकल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातही इम्रान यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना सोमवारपर्यंत म्हणजेच आजपर्यंत दिलासा मिळाला आहे. यावरही निर्णय होऊ शकतो.
आता बहाणे चालणार नाहीत
सुनावणीदरम्यान इम्रान खान यांच्या वकिलाने युक्तिवादात सांगितले- खान यांचे वय 71 वर्षे आहे. त्यांच्या पायावर प्लास्टर आहे. याशिवाय ते कोर्टात हजर झाले तर त्यांची सुरक्षाही धोक्यात येईल. यावर न्यायाधीश राणा रहीम म्हणाले - या देशातील सुरक्षेची जबाबदारी पोलिस आणि इतर विभागांवर आहे. तुम्हाला प्रत्येक बाबतीत दिलासा दिला जाऊ शकत नाही. आम्ही इम्रान यांना अटक करण्याचे आदेश जारी करत आहोत. पोलिसांनी त्यांना 29 मार्चपूर्वी हजर करावे.
आतापर्यंत 80 गुन्हे दाखल
खान यांच्यावर आतापर्यंत एकूण 80 गुन्हे दाखल आहेत. खान यांच्यावर तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून जास्त किमतीत विकल्याचा आरोप आहे. याबाबत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना 5 वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात इम्रान समर्थकांनी निवडणूक आयोग (EC) कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली, ज्यात काही लोक जखमीही झाले. या घटनेनंतर खान यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते.
गतवर्षी 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅलीदरम्यान इम्रान यांनी महिला न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावले होते. दरम्यान, इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या लीगल टीमने खान यांच्या अटकेपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो सोमवारी फेटाळण्यात आला.
टॅरिन व्हाइट केस
इम्रान यांच्यावर आरोप आहे की त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोनच अपत्य असल्याची माहिती दिली होती, मात्र अमेरिकेत मुलगी असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली नव्हती. याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याने इम्रान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, इम्रान आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. उच्च न्यायालयाने म्हटले - इम्रान यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. आम्ही यावर सुनावणी घेत राहू.
याचिकेत काय आहेत आरोप?
अमेरिकन कोर्टाच्या आदेशाने अडकले खान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.