आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मंगळवारी इस्लामाबाद पोलिस आणि रेंजर्स कमांडो पुन्हा एकदा माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोरच्या घरी पोहोचले. दरम्यान, इम्रान खान यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर समर्थकांना आवाहन केले आहे. म्हणाले- तुमच्या नेत्याच्या जिवाला धोका आहे. आपण एकजूट राहायला हवे. पक्षाने सोशल मीडियावर म्हटले आहे की, लवकरात लवकर लाहोरमधील झमान पार्क येथील खान साहेबांच्या घरी पोहोचा.
'डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार, इम्रान यांचे समर्थक पोलिसांवर दगडफेक करत आहेत. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याशिवाय वॉटर कॅननही पोलिसांकडे आहेत.
महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी इम्रान यांना सोमवारी अटक करण्यात येणार होती. त्यानंतर अखेरच्या क्षणी त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आता त्यांना तोशाखाना प्रकरणात अटक करावी लागणार आहे. न्यायमूर्तींनी त्यांना 29 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
गर्दी जमवून इम्रान यांचा बचावाचा प्रयत्न
'जिओ न्यूज'च्या लाइव्ह रिपोर्टनुसार, सोमवारी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने निवडणूक प्रचार सुरू करण्याची घोषणा केली. काही मिनिटांनी घाईगडबडीत रॅलीचेही नियोजन करण्यात आले. काळ्या बुलेट प्रूफ वाहनातून इम्रान घराबाहेर पडले आणि रॅली काढली. रिपोर्टनुसार, इम्रान कोणत्याही प्रकारे अटक टाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते समर्थकांच्या गर्दीचा आधार घेत आहेत. दुसरीकडे सुरक्षा दल आणि पोलीस त्यांना पकडण्यासाठी ठोस रणनीती बनवण्यात व्यग्र आहेत.
पोलिस आणि रेंजर्स कमांडोंचे पथक खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. खान यांच्या लाहोरमधील 'झमान पार्क' येथील घरावर नाकेबंदी करण्यात आली आहे. खान यांना अटक केल्यानंतर हेलिकॉप्टरने इस्लामाबादला आणले जाईल, असे मानले जात आहे.
आतापर्यंत 80 गुन्हे दाखल
डावपेच वापरून वाचत आहेत इम्रान
काही महिन्यांपूर्वी इम्रान यांच्या कथित हल्ला झाला होता आणि तेव्हापासून त्यांना त्यांच्या पायाला प्लॅस्टर लावून न्यायालयाकडून विविध सवलती मिळत होत्या. एक केस बेकायदेशीर पक्ष निधीशी संबंधित आहे आणि दुसरी दहशतवादाशी. त्यातही त्यांना अटक व्हायची आहे.
तोशाखाना प्रकरणातही इम्रान यांच्या वकिलाने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायाधीश म्हणाले की, जर ते इतर कोर्टात हजर होऊ शकतात, तर इथे यायला काय हरकत आहे. इम्रान पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली होती. तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू स्वस्तात विकत घेऊन चढ्या भावात विकल्याचा आरोप इम्रान यांच्यावर होता.
काय आहे तोशाखाना प्रकरण?
सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेले होते. इम्रान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात येते. इम्रान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्यांनी या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यांची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.
कसा झाला होता खुलासा?
2 वर्षांपूर्वी अबरार खालिद नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीने माहिती आयोगात अर्ज दाखल केला होता. त्यात विचारले होते की, इम्रान यांना इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती द्यावी. उत्तर मिळाले - भेटवस्तूंचे तपशील दिले जाऊ शकत नाहीत. खालिदही हट्टाला पेटले. त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
इस्लामाबाद हायकोर्टाने इम्रान यांना विचारले होते की, तुम्ही गिफ्ट्सची माहिती का देत नाही? यावर खान यांच्या वकिलाने उत्तर दिले - हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. इतर देशांशी संबंध बिघडू शकतात. म्हणूनच इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती आम्ही लोकांना देऊ शकत नाही.
चोरी कशी पकडली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.