आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Arrested, Escorted By Jawans From Court; For The First Time Pakistani People Attacked The Army

यादवी...:इम्रान खान अटकेत, जवानांनी कोर्टातून फरपटत नेले; प्रथमच पाकिस्तानी जनतेचा लष्करावर हल्ला

इस्लामाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात मंगळवारी राजकीय रणकंदन झाले. पाक रेंजर्सनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्ट परिसरात अटक करून फरपटत नेले. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरली. सायंकाळपर्यंत इम्रान समर्थकांनी लाहोरपासून ते थेट रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयावर कब्जा करण्यासाठी हल्ला चढवला.

लष्कराविरुद्ध प्रथमच एवढा संताप दिसून आला आहे. लष्करी वाहनांवर महिलांनी दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत सुमारे डझनभर शहरांमध्ये उग्र निदर्शने करीत इम्रान समर्थकांनी लष्कर आणि सरकारविरुद्ध युद्धच पुकारले. इकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ लंडनमध्ये तर लष्करप्रमुख आसिम मुनीर ओमानमध्ये आहेत.

पाकमध्ये मार्शल लॉची परिस्थिती, लष्कराच्या अस्तित्वाला धोका
इम्रान यांच्या अटकेनंतर लष्कराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे. लष्कराला याची कल्पना नव्हती. त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती पाहता लवकरच मार्शल लॉ लागू झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. आपल्या लोकप्रियतेच्या बळावर लष्कराचा मुकाबला करणारे आणि लष्कराचा अहंकार मोडून काढणारे पहिलेच राजकीय नेते आहेत. यापूर्वी लियाकत अली आणि बेनझीर भुत्तो यांनी लष्कारास अाव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोघांचाही खूपच दु:खद शेवट झाला. भारताविरोधात एकही युद्ध जिंकू न शकलेले पाकिस्तानी लष्कर आपल्याही भल्याचे नाही, हे जनतेला कळून चुकले आहे. लोकशाहीच्या मार्गात सर्वात मोठी अडचण लष्करच आहे. जनतेच्या याच भावनेचा फायदा इम्रान खान करून घेत अाहेत.

अटकेपूर्वी इम्रान आणि लष्करामध्ये झाला वाद
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये माझ्यावर झालेल्या हल्ल्यात आयएसआयचे मेजर-जनरल फैसल नासिर यांचा हात होता, असा आरोप इम्रान यांनी ६ मे रोजी एका रॅलीत केला होता. ८ मे रोजी लष्कराने इम्रान यांनी बिनुडाचे आरोप करू नये, असे बजावले होते. इम्रान यांनी मंगळवारी कोर्टात जात असतानाही लष्कराविरुद्ध वक्तव्ये केली होती.

मियांवालीत लष्कराच्या एअरबेसमध्ये घुसले लोक
- पेशावरमध्ये रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीला आग लावण्यात आली.
- पाकिस्तानात सोशल मीडियावर बंदी. अनेक ठिकाणी मोबाइल इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
- इम्रान समर्थक आंदोलकांनी खैबर पख्तूनख्वा विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराला आग लावली.
- इम्रान यांच्या अटकेविरुद्ध पीटीआयच्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला.
- इम्रान यांना सध्या रावळपिंडीत एनएबी मुख्यालयात ठेवले.
- भारताने अांतरराष्ट्रीय सीमा व एलओसीवर हाय अलर्ट जारी केला.