आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Bushra BiBi | Pinki Peerni In News Again As Army Chief General Bajwa Angry With Pakistan PM Over ISI DG

पिंकी पीरनीच्या हातात पाकची सत्ता?:पाकिस्तानमध्ये पिंकी पीरनीची जोरदार चर्चा, विरोधकांचा आरोप - इम्रान तिच्या इशाऱ्यावरच घेतात सर्व निर्णय; लष्करही नाराज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चला जाणून घेऊया काही रंजक गोष्टी....

अखेर दहा दिवसांनी का होईना पण पाकिस्तानमध्ये ISI च्या प्रमुखांच्या नियुक्तीचा प्रश्न आता काही प्रमाणात सुटलेला दिसत आहे. असे मानले जाते की लष्कर मुख्यालयाने पंतप्रधान इम्रान खान यांना एक सारांश पाठवला आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर जनरल नदीम अंजुम काही दिवसांत आयएसआय प्रमुख होतील.

मात्र, या दरम्यान काही विचित्र गोष्टीही समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, इम्रान खान यांनी आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीवरून लष्करप्रमुखांशी वाद घातला होता. कारण पिंकी पीरनीने त्यांना जुने चीफ जनरल फैज हमीद यांना या पदावर ठेवण्यास सांगितले होते. आता ही पिंकी पीरनी आहे तरी कोण? हा प्रश्न उपस्थित होतोय. मुख्य विरोधी पक्ष नेते इशा-यावरुन जादूटोण्याबद्दल का बोलत आहेत आणि इम्रानचे मंत्री शेख रशीदही त्यांचा बचाव करण्यास सक्षम का नाहीत? चला जाणून घेऊया काही रंजक गोष्टी....

सर्वप्रथन ही पिंकी पीरनी आहे तरी कोण ते जाणून घेऊन
इम्रान यांची पत्नी बुशरा बीबीला पिंकी पीरनी असेही म्हणतात. इम्रान बुशराला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, ही पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. याची अनेक उदाहरणेदेखील आहेत. तिथल्या माध्यमांमध्येही त्याचा वारंवार उल्लेख झाला आहे. बुशरा इम्रानची तिसरी पत्नी आहे. बुशरापूर्वी त्यांनी जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खान यांच्याशी लग्न केले होते. तर बुशराचे इम्रान यांच्यासोबतचे हे दुसरे लग्न असून पहिल्या लग्नापासून तिला पाच मुले आहेत. ती कायम बुरख्यामध्येच असते. इम्रान यांच्याशी लग्नापूर्वीचे तिचे काही फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. असे म्हटले जाते की, ती चेटूक आणि अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवते आणि इम्रान यांच्यावर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. संपूर्ण पाकिस्तान त्याबद्दल चर्चा करत आहे.

इम्रान खानसोबत बुशरा बीबी. हा फोटो ब-याच काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इम्रान खानसोबत बुशरा बीबी. हा फोटो ब-याच काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मरियम यांचे विधान महत्त्वाचे
अलीकडेच बुशराचा मुद्दा मुख्य विरोधी पक्षनेत्या मरियम नवाज यांनी उपस्थित केला होता. पिंकी पिरनीचे नाव न घेता त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, देशाचे पंतप्रधान कशापद्धतीने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन महत्वाच्या नेमणुकांसाठी चेटुक आणि भुतांप्रेतांचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत जर पाकिस्तान जगात तमाशा बनत असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. जर जंतर -मंतर, भूत आणि जादुटोणा इतके प्रभावी आहेत, तर मग ते देशाच्या भल्यासाठी का वापरत नाहीये?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी म्हणाले होते - काश या जादूटोण्याने काही चांगले घडले असते तर... आमच्या देशाने तीन वर्षात चार अर्थमंत्री पाहिले. इम्रानला आता कोण योग्य मार्ग दाखवेल हे कळत नाहीये.

बुशराचे हे दुसरे आणि इम्रान यांचे तिसरे लग्न आहे. असे म्हटले जाते की बुशरा जादूटोण्यावर खूप विश्वास ठेवतात.
बुशराचे हे दुसरे आणि इम्रान यांचे तिसरे लग्न आहे. असे म्हटले जाते की बुशरा जादूटोण्यावर खूप विश्वास ठेवतात.

दोन घटनांनी वेधले होते लक्ष
अलीकडेच सोशल मीडियावर दोन बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिली- गेल्या आठवड्यात जेव्हा आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीवरून लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि इम्रान खान यांच्यात मतभेद होते, तेव्हा अशी बातमी आली होती की, लष्कराने इम्रान खानच्या बनी गालाच्या घरात गेलेल्या दोन लोकांना अटक केली होती. असे म्हणतात की हे लोक तिथे जाऊन लष्करप्रमुखांसाठी काळी जादू करायचे.

दुसरी- लष्कराने जंगलातून 6 लोकांना अटक केली. हे लोक कापडी बाहुल्यांमध्ये पिना टोचत होते. असे म्हटले जाते की, हा देखील एक प्रकारचा जादूटोणा आहे आणि हेदेखील बुशरा करुन घेत होती.

आणि अजून एक गोष्ट म्हणजे अलीकडेच पाकिस्तानचे कथिक अणुबॉम्ब जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांचे निधन झाले. प्रत्येक जण नमाज-ए-जनाजाला हजर होते, पण इम्रान अनुपस्थित होते. असे म्हटले जाते की, पिंकी पीरनीच्या सांगण्यावरून इम्रान कधीही कोणत्याही अंत्यसंस्काराला उपस्थित राहत नाहीत.

हा फोटो 1997 चा आहे. त्यावेळी राजकुमारी डायना यांनी लाहोरमध्ये इम्रान यांच्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली होती. मध्यभागी इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा आणि इम्रान यांच्या कडेवर त्यांचा मुलगा सुलेमान दिसत आहेत.
हा फोटो 1997 चा आहे. त्यावेळी राजकुमारी डायना यांनी लाहोरमध्ये इम्रान यांच्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली होती. मध्यभागी इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा आणि इम्रान यांच्या कडेवर त्यांचा मुलगा सुलेमान दिसत आहेत.

मंत्री देखील असहाय्य
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान इम्रान यांच्या जादूटोण्यावर जास्त अवलंबून राहण्याबद्दल प्रश्न विचारला गेला होता. या प्रश्नाचे उत्तर देणे टाळताना रशीद म्हणाले - हे सर्व देखील वरच्याने (परमेश्वर) बनवले आहे. माझ्या शहरात अनेक लोक दर्ग्यांवर ताबीज आणि इतर वस्तू बनवण्यासाठी जातात. आपल्याकडे याची परंपरा आहे.

तसे पाहता इम्रानच नव्हे तर त्यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हे स्वतः देखील एक व्यावसायिक बाबा आहेत आणि त्यांना दर्ग्यांवर केस कापतानाही पाहिले गेले आहे. मात्र, असेही म्हटले जाते की, नवाज शरीफ आणि जरदारी यांच्या काळात देखील काही प्रमाणात अशा गोष्टी घडत होत्या. पण आता जे घडत आहे, तसे पूर्वी घडले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...