आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना काही अटींसह जामीन मंजूर केला. दुसरीकडे पंजाब पोलीस आणि रेंजर्सची पथके उच्च न्यायालयाबाहेर हजर आहेत. खान आणि त्याच्या वकिलाला शंका आहे की, बाहेर आल्यानंतर त्यांना आणखी काही प्रकरणांमध्ये अटक केली जाऊ शकते.
'जिओ न्यूज'नुसार - इम्रान यांना याचा सुगावा लागला, त्यानंतर ते आपल्या वकिलाच्या मोबाईलवरून एका मीडिया पर्सनशी बोलले. म्हणाले- आता अटकेची कारवाई झाली तर गदारोळ होईल, यासाठी मला जबाबदार धरू नका.
अल कादिर ट्रस्ट घोटाळ्यातील इम्रान यांना झालेली अटक बेकायदेशीर ठरवत त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले होते. त्यांना शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन घेण्याचे सांगण्यात आले होते.
दुसरीकडे, तोशाखाना प्रकरणात खान यांना दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. खरे तर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने याप्रकरणी फौजदारी खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. याविरोधात इम्रानने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सांगितले- पुढील आदेशापर्यंत सत्र न्यायालय याप्रकरणी कोणतीही सुनावणी घेणार नाही.
इम्रान यांनी पोलिस लाइनमध्ये रात्र काढली
सुप्रीम कोर्टाने सुटका केल्यानंतर माजी पंतप्रधानांना पोलिस लाइनच्या गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले. खरे तर सुप्रीम कोर्टाने खान यांची घरी जाऊ देण्याची विनंती फेटाळून लावली होती आणि त्यांना पोलीस लाइनमध्येच राहावे लागेल असे सांगितले होते. मात्र, या काळात त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जाणार नाही. त्यांच्या 10 समर्थकांनाही इम्रानसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान इम्रान यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचेही आवाहन केले होते.
इम्रान यांच्या सुटकेनंतर राष्ट्रपती अल्वी यांनी घेतली इम्रान यांची भेट
इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्यांची पोलीस लाइनच्या गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. जिओ न्यूजनुसार राष्ट्रपती अल्वी यांनी खान यांना अटक केल्यानंतर देशात पसरलेल्या हिंसाचाराबद्दल सांगितले. यापूर्वी इम्रान खान यांच्या अटकेवर अल्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले होते.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून खान यांच्या अटकेवर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी लिहिले की, 'इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ पाहून मला आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. ते देशाचे मोठे नेते आहेत. अशाप्रकारे त्यांची अटक चुकीची आहे.
राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशिवाय गिलगिट बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांनीही रात्री उशिरा दोन तास इम्रान खान यांची भेट घेतली.
इम्रान यांच्या खटल्याच्या सुनावणीपूर्वी 5 मोठे अपडेट्स...
इम्रान यांच्या सुटकेनंतर जल्लोष करताना समर्थकांची 3 छायाचित्रे...
सुप्रीम कोर्टाने खान यांची हायकोर्टातून झालेली अटक बेकायदेशीर ठरवली
पीटीआयच्या अपिलानंतर गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश उमर अता बंडयाल यांनी इम्रान यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सरन्यायाधीश बंडयाल म्हणाले होते - उच्च न्यायालयाने केलेली अटक ही न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात अपमानास्पद घटना आहे. इम्रान यांच्या बेकायदेशीर अटकेनंतर ज्याप्रकारे गोंधळ झाला तो योग्य नाही. देशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
इम्रान सुप्रीम कोर्टात म्हणाले- मला अटक झाली नाही, माझे अपहरण करण्यात आले
खान कोर्टात पोहोचल्यावर सरन्यायाधीशांनी इम्रान यांना त्याच्या तब्येतीची विचारणा केली. यावर खान म्हणाले- मला अटक झाली नाही, माझे अपहरण झाले. कोठडीत मारहाण करण्यात आली.
सरन्यायाधीश म्हणाले - आम्ही तुम्हाला सोडण्याचे आदेश देत आहोत. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांशी चर्चा करावी. त्यामुळे देशात शांततेचे वातावरण निर्माण होईल. सुटकेनंतर इम्रान म्हणाले- मला दहशतवादी असल्याप्रमाणे अटक करण्यात आली. गुन्हेगारासारखी वागणूक दिली. लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. 145 हून अधिक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
आता समजून घ्या... इम्रान यांना कसे अटक करण्यात आले आणि नंतर सोडण्यात आले
पाहा फोटोज..
सरकारने म्हटले- लाडक्याच्या अटकेमुळे सर्वोच्च न्यायालय अस्वस्थ
दुसरीकडे, सरकारच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब म्हणाल्या – लाडक्याच्या अटकेमुळे न्याय देणारे अस्वस्थ झाले आहेत. पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंडयाल यांनी पदाचा राजीनामा देऊन पीटीआयमध्ये जावे. मरियम म्हणाल्या- सर्वोच्च न्यायालय दहशतवाद्याला शह देत आहे. इम्रान यांच्या अटकेनंतर एका कटाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. लष्करावर हल्ला झाला.
मरियम पुढे म्हणाल्या- तुमच्या लाडक्याने एका दिवसात जितके नुकसान केले तितके भारत 75 वर्षांत करू शकला नसते. सुप्रीम कोर्टाने इम्रान यांच्या 60 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी का केली नाही? या माणसामुळे दोन दिवसात संपूर्ण देश पेटला. याआधी त्यांनी पोलिस आणि रेंजर्सवर हल्ला चढवला होता. तेव्हा सर्वोच्च न्यायालय गप्प का होते?
काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण, ज्यात इम्रान अडकले
सरकारच्या म्हणण्यानुसार, खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमाफिया मलिक रियाझ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. लंडनमध्ये त्यांचे 40 अब्ज जप्त केले. नंतर हा पैसा ब्रिटिश सरकारने पाकिस्तानला दिला. इम्रानने ही माहिती मंत्रिमंडळालाही दिली नाही.
यानंतर इम्रान यांनी अल कादिर ट्रस्टची स्थापना केली. धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठाची स्थापना केली. यासाठी मलिक रियाझ यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन दिली. तसेच बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्याबदल्यात रियाझ यांची सर्व प्रकरणे वगळण्यात आली. कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटेही त्यांना मिळाली. गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले - सरकारी तिजोरीला 60 अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. 13 महिन्यांत एकदाही इम्रान किंवा बुशरा चौकशीसाठी आले नाहीत. 4 वर्षांनंतरही या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.