आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:इम्रान खान बिथरले, नवाझसह 40 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, विरोधकांच्या पीडीएम आघाडीविरोधात सरकारची कारवाई

इस्लामाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भीती का? : विरोधकांकडून 26 मुद्द्यांचा प्रस्ताव मंजूर

पाकिस्तानात विरोधी पक्षांच्या आघाडीमुळे इम्रान खान सरकार बिथरलेले दिसत आहे. विरोधकांवरील नियंत्रणांसाठी विरोधकांवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. या १ ऑक्टोबरला इस्लामाबादेत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि पीओकेचे प्रमुख नेते राजा मोहंमद फारुख अहमद खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तिघांविरोधात एका स्थानिक नागरिकाने तक्रार केली होती. सूत्रांनुसार, नवाझ शरीफांवर लंडनमधून पाकविरोधी प्रक्षोभक भाषणे करत असल्याचा आरोप आहे. ते पाकच्या राज्यघटनेचा अपमान करत आहेत. एफआयआरमध्ये नवाझ यांच्या पीएमएल (एन) पक्षाच्या ४० नेत्यांचे नाव आहे. विरोधी आघाडी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मुव्हमेंटमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल- एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), अवामी नॅशनल पार्टी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (जेयूआई-एफ) हे प्रमुख पक्ष आहेत. आघाडीचे प्रमुख जेयूआय-एफचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान आहेत. ज्यांनी इम्रान सरकारविरोधात आझादी मोर्चाचे नेतृत्व केले होते.

विधानसभेत राजीनामा, जानेवारीत लाँग मार्च काढण्याचा इशारा
विरोधकांची नवीन आघाडी देशात राजकीय क्रांती घडवेल, असे नवाझ यांच्या पक्षाने म्हटले आहे. पीपीपी नेते बिलावल भुत्तो झरदारी म्हणाले, सरकार राष्ट्रीय उत्तरदायी विभागावर दबाव टाकत आहे. आता देशामध्ये मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत. यात अनेक मोर्चे काढले जातील. तसेच वि‌धानसभेतही राजीनामे दिले जातील. जानेवारीत इस्लामाबादेत लाँग मार्च काढला जाईल.

विरोधकांकडून पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी
विरोधकांच्या संयुक्त आघाडीने आपल्या बैठकीत २६ मुद्द्यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यात पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने येथील नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार केले असे म्हटले आहे. विशेषत: नेत्यांना निशाणा बनवण्यात आले. यात सैन्याची भूमिका मोठी आहे. राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय विरोधकांनी इम्रान यांच्या राजीनाम्यासह देशात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

इम्रानसारखी कळसूत्री बाहुली लष्कराची आवड, विरोधकांनाही ‘गैर शरीफ’ नेता गरजेचा
गौतम बम्बावले, पाकमधील भारताचे माजी उच्चायुक्त

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या घटनाक्रमांमुळे भ‌विष्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इम्रान खान यांच्यासारखी कळसूत्री बाहुुली लष्कराची आवड आहे. लष्कराच्या समर्थनामुळे इम्रान खान यांची खुर्ची पुढील निवडणुकीपर्यंत सुरक्षित दिसत आहे. मात्र नवाझ शरीफ आणि त्यांचे भाऊ शाहबाज किंवा मुलगी मरियमला लष्कर पंतप्रधान होऊ देणार नाही हेही निश्चित आहे. विरोधकांनाही ‘गैर शरीफ’ नेता शोधावा लागेल. विरोधकांकडे फजलुर रहमान हे दबंग नेते आहेत.

बातम्या आणखी आहेत...