आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान सरकार कोसळणार हे निश्चित:मित्र पक्ष म्हणाला, पंतप्रधानांनी स्वतः जाऊन खासदारांची समजूत काढावी, असे केले नाही तर सरकार वाचवणे अवघड

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकच्या इम्रान खान सरकारचा वाईट काळ सुरु झाला असून, हे सरकार केव्हाही कोसळू शकते. हा दावा इम्रान सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या 'पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद'चे(पीएमएल-क्यु) प्रमुख चौधरी परवेज इलाही यांनी केला आहे. ते म्हणाले, हे सरकार १०० टक्के संकटात आहे. ते वाचवणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. पंतप्रधानांनी स्वतः जावून आपल्या खासदारांची समजूत काढळी नाही, तर कदाचित येत्या काही दिवसांतच सरकार कोसळू शकते.

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. स्थानिक माध्यमांनी इम्रान यांच्या 'पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा'चे (PTI) जवळपास १८ ते २० खासदार बंडखोरी करुन स्वतःच्या सरकारविरोधात मतदान करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.

इलाही काय म्हणाले?
चौधरी परवेज इलाही पाकच्या सर्वात मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत. ते पंजाब प्रांतातून येतात. त्यांच्या पक्षाचे ५ खासदार इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत. पंजाब प्रांतातही सध्या इम्रान यांच्या पक्षाचे सरकार असून, येथेही इलाही यांचे काही आमदार सरकारला पाठिंबा देत आहेत. माध्यमांनी इम्रान यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांचीही खूर्ची संकटात असल्याचा दावा केला आहे.
परवेज यांनी याकडेही अंगुलीनिर्देश केला आहे. ते म्हणाले, इम्रान यांना आता बाहेर पडून आपल्या सहकारी पक्षांकडे जावे लागेल. आता अहंकार, बोलघेवडेपणा किंवा भीती दाखवून अथवा धमकावून काम चालणार नाही. त्यांना आपल्या सहकाऱ्यांची समजूत काढावी लागेल. असे केले नाही तर या सरकारला कुणीही वाचवू शकत नाही.

चौधरी परवेज इलाही पाकच्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या पक्षाचे 5 खासदार इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत.
चौधरी परवेज इलाही पाकच्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या पक्षाचे 5 खासदार इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत.

इम्रानवर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज
गत अनेक दिवसांपासून माध्यमांत येणाऱ्या वृत्तांचाच परवेज यांनी पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, आता सरकार कसे चालणार यात लपवण्यासारखे काहीच नाही. इम्रान यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्यावर नाराज असून, ते २८ मार्च रोजी सरकारविरोधात मतदान करतील यात कोणतीही शंका नाही. इम्रान यांना स्वतःचाच पक्ष सांभाळता येत नाही. ते सहकारी पक्षांना काय सांभाळणार? आज सरकारवर संकट आले असताना ते अनेक प्रकारचे दावे करत आहेत. पाठिंब्यासाठी विविध प्रकारची आश्वासने देत आहेत. ते गत ४ वर्षे काय करत होते हा मूळ प्रश्न आहे. त्यांनी तेव्हा सहकाऱ्यांची काळजी का घेतली नाही.

इम्रान सरकारकडे सध्या 179 खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी 172 खासदारांची गरज आहे. सहकारी पक्षांचे ७ खासदारही या सरकारला समर्थन देत आहेत.
इम्रान सरकारकडे सध्या 179 खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी 172 खासदारांची गरज आहे. सहकारी पक्षांचे ७ खासदारही या सरकारला समर्थन देत आहेत.

कुठे फसरणार इम्रान?
'द डॉन'च्या वृत्तानुसार, इम्रान सरकारकडे सध्या 179 खासदारांचे समर्थन आहे. बहुमतासाठी १७२ खासदारांची गरज आहे. सहकारी पक्षांचे 7 खासदार या सरकारला पाठिंबा देत आहेत. वृत्तानुसार, 18 ते 20 खासदार विरोधकांची साथ देण्यास तयार आहेत. कारण, त्यांना इम्रान यांच्यासोबत कोणतेही भविष्य दिसून येत नाही. असे झाले तर विरोधकांची एकूण संख्या 200 च्या आसपास पोहोचेल. तर सरकारकडे 160 हून कमी खासदारांचे संख्याबळ राहील. अशा स्थितीत सरकार कोसळणे जवळपास निश्चित आहे.

बातम्या आणखी आहेत...