आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Health Updates, PTI Rally Lahore Protest Update | Azadi March, Pakistan Former PM Imran Khan Attacked In Rally

इम्रान खान यांच्या पायात अडकले होते गोळीचे तुकडे:माजी पंतप्रधानांचे दीड तास चालले ऑपरेशन, हाड कापले

इस्लामाबाद/गुजरांवालाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांचे ऑपरेशन दीड तास चालले. पायात गोळीचे काही तुकडे अडकले होते, ते काढण्यात आले आहेत. शौकत खानम रुग्णालयाचे डॉ. फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांच्या पायाचे हाड उजव्या बाजूने कापले गेले आहे.

दुसरीकडे, या हल्ल्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उग्र आंदोलक रस्त्यावर जाम मोर्चा काढताना दिसले. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि घोषणाबाजी करण्यात आली.

गुरुवारी गुजरांवाला येथे लाँग मार्चदरम्यान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचे खासदार फैसल जावेद यांच्यासह एकूण 13 जण जखमी झाले. एकाचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर इम्रान यांनी म्हटले की, अल्लाहने मला नवीन जीवन दिले आहे. इन्शाअल्लाह आम्ही पुन्हा परत येऊ आणि आमचा लढा सुरू ठेवू.

हल्ल्याशी संबंधित दोन फोटो

इम्रान खान यांना रुग्णालयात नेले असताना ते समर्थकांशी बोलत होते.
इम्रान खान यांना रुग्णालयात नेले असताना ते समर्थकांशी बोलत होते.
या हल्ल्यात पीटीआयचे खासदार फैसल जावेद जखमी झाले.
या हल्ल्यात पीटीआयचे खासदार फैसल जावेद जखमी झाले.

आता ही घटना क्रमवार समजून घ्या...

1. इम्रान यांनी लाँग मार्च का काढला?

इम्रान यांनी 28 ऑक्टोबर रोजी शाहबाज शरीफ सरकारचा राजीनामा आणि तत्काळ सार्वत्रिक निवडणुकांच्या मागणीसाठी लाँग मार्च सुरू केला होता. या लाँग मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका महिला पत्रकारासह तीन जणांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. मे महिन्यातही इम्रान यांनी लाँग मार्च काढला होता आणि त्यादरम्यान प्रचंड हिंसाचार झाला होता.

2. हल्ला केव्हा आणि कुठे झाला?

इम्रान खान यांचा लाँग मार्च गुरुवारी गुजरांवाला येथे पोहोचला. येथे ते सभा घेत होते. कंटेनरच्या छतावर उभे होते. तेवढ्यात एका व्यक्तीने त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.

इम्रान खान कंटेनरमध्ये उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला झाला.
इम्रान खान कंटेनरमध्ये उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला झाला.

3. इम्रान यांना कुठे लागली गोळी?

या गोळीबारात माजी पंतप्रधान जखमी झाले. त्यांच्या पायाला गोळी लागली. किती गोळ्या झाडल्या याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये आधी 3 ते 4 आणि आता दोन बुलेट्स झाडल्याचे समोर येत आहेत.

4. हल्लेखोर कोण होता आणि त्याला काय हवे होते?

हल्ल्यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली. पोलिसांनी अद्याप त्याच्या नावाबाबत माहिती दिलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव फैसल, तर काहींमध्ये जावेद इक्बाल असे नमूद करण्यात आले आहे.

हा फोटो गोळीबाराच्या वेळचा आहे. हल्लेखोराने गोळीबार सुरू करताच मागे उभ्या असलेल्या तरुणाने (लाल-निळ्या टी-शर्टमध्ये) हात धरून त्याला थांबवले.
हा फोटो गोळीबाराच्या वेळचा आहे. हल्लेखोराने गोळीबार सुरू करताच मागे उभ्या असलेल्या तरुणाने (लाल-निळ्या टी-शर्टमध्ये) हात धरून त्याला थांबवले.

येथे, घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर शस्त्रांसह गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मागून एका व्यक्तीने त्याला पकडल्याने तो त्याच्यापासून पळू लागला, मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला लगेच पकडले.

हल्लेखोराचा हा व्हिडिओ समोर आला असून त्यात तो सभेतील गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
हल्लेखोराचा हा व्हिडिओ समोर आला असून त्यात तो सभेतील गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

5. हल्लेखोर म्हणाला– अजानदरम्यान डीजे वाजवल्याचा राग होता

या हल्लेखोराच्या पोलीस कोठडीत दिलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानच्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी शेअर केला आहे. यामध्ये आरोपीने तो एकटाच हल्ला करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्याला इम्रान यांना ठार मारायचे होते, कारण खान यांच्या लाँग मार्चमध्ये अजानच्या वेळीही डेक (डीजे) वाजत होता. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

6. दावा- पंतप्रधान, गृहमंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी हल्ल्यात सामील

पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांनी गुरुवारी दावा केला की, पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या हत्येच्या प्रयत्नामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्यावर संशय आहे.

7. घटनास्थळी 11 बुलेट शेल सापडले

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी 11 बुलेट शेल सापडले आहेत. यापैकी 9 पिस्तुलाच्या गोळ्यांचे, तर दोन मोठ्या बंदुकीच्या गोळ्यांचे होते. ते म्हणाले– जमिनीवरून कंटेनरच्या दिशेने पिस्तुलाच्या गोळ्या झाडण्यात आल्या, तर कंटेनरमधून मोठ्या बंदुकीतून जमिनीवर गोळी झाडण्यात आली. त्याचवेळी, पीटीआय नेत्यांचे म्हणणे आहे की, हा हल्ला एके-47 ने करण्यात आला.

जखमी इम्रान यांनी समर्थकांना केले अभिवादन

लाँग मार्चमध्ये गोळी लागल्याने जखमी झालेल्या इम्रान खान यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी आपल्या समर्थकांना अभिवादन केले. यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांच्या घेरावात त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांच्या मदतीने इम्रान यांना कंटेनरमधून दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांच्या मदतीने इम्रान यांना कंटेनरमधून दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले.

पाकिस्तानच्या अनेक शहरांत आंदोलन, जाळपोळ

इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतर कराचीतील अनेक भागांत पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतर कराचीतील अनेक भागांत पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत निदर्शने केली. येथून जाळपोळ झाल्याच्या बातम्याही येत होत्या.
इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत निदर्शने केली. येथून जाळपोळ झाल्याच्या बातम्याही येत होत्या.
बातम्या आणखी आहेत...