आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan House Update | Pakistan Prime Minister (PM) Imran Khan Islamabad House On Rent; News And Live Updates

आर्थिक संकटात पाकिस्तान:​​​​​​​इम्रान सरकार पंतप्रधानांचे निवासस्थान देणार भाड्याने; गेस्ट रुमपासून लॉनपर्यंत सर्वकाही राहणार उपलब्ध

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमच्याकडे जनतेसाठी पैसा नाही - इम्रान खान

आर्थिक संकटाचा सामना करणारा पाकिस्तानने पंतप्रधानांचे निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान आता सर्वसामान्य लोकांना भाड्याने घेता येणार आहे. या निर्णयामुळे आता लोक सांस्कृतिक, फॅशन आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांसाठी हे निवासस्थान भाड्याने घेऊ शकतील.

यापूर्वी विद्यापीठ बनवण्याची केली होती घोषणा
पाकिस्तानात ऑगस्ट 2019 मध्ये तेहरिक-पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार स्थापन झाले होते. तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान अमरान खान यांनी सरकारी निवासस्थाने विद्यापीठात बदलण्याची घोषणा केली होती. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने आता विद्यापीठ प्रकल्पाकडे पाठ फिरवली असून पंतप्रधान निवास भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

राजनैतिक कार्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करता येणार
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान लवकरच याप्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये सरकारी निवासस्थानातून मिळणाऱ्या महसूलवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान निवासस्थानाचे सभागृह, दोन अतिथी विंग आणि लॉन भाड्याने देऊन महसूल गोळा केला जाईल. या कॅम्पसमध्ये राजनैतिक कार्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे देखील आयोजित केली जातील.

आमच्याकडे जनतेसाठी पैसा नाही - इम्रान खान
इम्रान खान यांनी 2019 मध्ये पाकिस्तान पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांनी देशातील लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इम्रान खान त्यांच्या 'बानी गाला' निवासस्थानी राहत असून फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करतात.

बातम्या आणखी आहेत...