आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी चाल:इम्रान खान अडकले, चिनी कंपन्यांची कार्यालये सुरू करण्यास इमरान सरकार राजी

इस्लामाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद : पंतप्रधान इम्रान यांनी चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. - Divya Marathi
इस्लामाबाद : पंतप्रधान इम्रान यांनी चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
  • चिनी कंपन्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार : इमरान खान

पाकिस्तानमध्ये आता चिनी कंपन्या आपली क्षेत्रीय कार्यालये सुरू करू शकतील. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी १० मोठ्या चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. ऊर्जा, कृषी, अर्थ, माहिती क्षेत्रातील कंपन्यांचा यात समावेश आहे. बैठकीला या प्रतिनिधींसह चिनी राजदूत यो जिंग व पाकिस्तानचे मंत्री व अधिकारीही सहभागी झाले.

सरकार चिनी गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन इम्रान यांनी दिल्याचे पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द डॉन’ ने म्हटले आहे. पाकिस्तान-चीन संबंध अतिशय बळकट करणे असा आमचा उद्देश आहे, असे इम्रानने म्हटले आहे. दुसरीकडे चीनचे राजदूत जिंग म्हणाले, पाकिस्तानकडे आम्ही व्यापाराचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहतो. सीपीईसी चीन व पाकिस्तान यांच्यातील संबंध बळकट केले जातील, अशी घोषणा इम्रान यांनी केली होती. दहशतवाद रोखण्यासाठी योग्य कारवाई केली नसल्याबद्दल एफएटीएफने पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पाकिस्तानवर इतर देशांचे मोठे कर्ज आहे.

डाव: आमच्यासाठी पाक व्यापाराचे नवे केंद्र,चीनचे राजदूत जिंग यांचे वक्तव्य

गेल्या महिन्यात पाकिस्तान व चीनने पीआेकेमध्ये कोहला जलविद्युत प्रकल्पासंबंधी करार केला. आझाद पट्टन चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) भाग असून त्याद्वारे ७००.७ मेगावॅट वीज उत्पादनाची योजना आहे. त्यात चीनची जियोझाबा कंपनी ११ हजार ४३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

नाईलाज : चिनी कंपन्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार : इमरान खान

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser