आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Injured In Firing, Know About Man Who Saved Former Pak PM, Stood Behind The Assailant, Pakistan News

इम्रान यांचा जीव वाचवणाऱ्याची कहाणी:हल्लेखोराच्या मागे उभा होता, बंदूक पाहताच हात धरून ओढली, म्हणून निशाणा चुकला

इस्लामाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओमध्ये लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने हल्लेखोराला पकडले आणि इम्रान यांचा जीव वाचवला. - Divya Marathi
व्हिडिओमध्ये लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने हल्लेखोराला पकडले आणि इम्रान यांचा जीव वाचवला.

3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या इस्लामाबाद मोर्चात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. यादरम्यान इम्रान खानच्या पायात तीन ते चार गोळ्या लागल्या. त्यांच्या एका समर्थकाने त्यांचे प्राण वाचवले. खरं तर, हल्लेखोर गोळीबार करत असताना खान यांच्या समर्थकाने हल्लेखोराचा हात धरून बंदूक खाली खेचली, ज्यामुळे निशाणा चुकला, आणि गोळ्या छातीऐवजी पायाला लागल्या.

निशाणा चुकल्यानंतर हल्लेखोर लगेच पळून जात होता, पण समर्थकाने पाठलाग सोडला नाही आणि त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. घटनेच्या वेळी इम्रान खान कंटेनरवर काही लोकांमध्ये उभे होते आणि समर्थकांना अभिवादन करत होते.

फोटोत काळ्या कपड्यात एक हल्लेखोर दिसत आहे, त्याला मागे उभ्या असलेल्या इम्रानच्या समर्थकाने पकडले होते.
फोटोत काळ्या कपड्यात एक हल्लेखोर दिसत आहे, त्याला मागे उभ्या असलेल्या इम्रानच्या समर्थकाने पकडले होते.

जीव वाचवणाऱ्याने सांगितली हकिगत

हल्ला अयशस्वी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मी इम्रान खान यांच्याकडे पाहत होतो, तेव्हाच मला हल्लेखोर बंदूक लोड करताना दिसला. तो इम्रान खान यांच्यावर गोळी झाडणार होता, पण मी त्याचा हात धरून ओढला. निशाणा चुकला आणि तो लगेच पळून जाऊ लागला. मीही त्याच्या मागे धावलो आणि काही लोकांच्या मदतीने त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्या व्यक्तीने सांगितले की, हल्लेखोराने स्वयंचलित शस्त्राने गोळीबार केला होता. यादरम्यान गोळी दुसऱ्या व्यक्तीला लागली.
त्या व्यक्तीने सांगितले की, हल्लेखोराने स्वयंचलित शस्त्राने गोळीबार केला होता. यादरम्यान गोळी दुसऱ्या व्यक्तीला लागली.

माजी पत्नी म्हणाली 'हीरो'

या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहून इम्रान खान यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी इम्रान यांचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. त्यांनी या व्यक्तीला हीरो म्हटले. जेमिमा यांनी ट्विटमध्ये लिहिले - ते (इमरान) वाचले. त्यांची मुले त्या धाडसी तरुणाचे (हिरो) आभारी आहेत, ज्याने हल्लेखोराला पकडून दिले आणि त्यांच्या वडिलांचे प्राण वाचवले.

1995 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी इम्रान खान यांनी 21 वर्षीय जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले. त्यांचे लग्न 1995 ते 2004 पर्यंत टिकले.
1995 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी इम्रान खान यांनी 21 वर्षीय जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले. त्यांचे लग्न 1995 ते 2004 पर्यंत टिकले.

सोशल मीडियावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक इम्रान यांचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. ट्विटरवर एका युझरने या व्यक्तीला पाकिस्तानचा खरा हिरो म्हटले आहे. ते म्हणाले- या माणसाने एकट्याने इम्रान खान यांचा जीव वाचवला. आणखी एका युझरने या व्यक्तीला 'सुपरस्टार ऑफ द डे' म्हटले आहे.

आणखी एका युझरने म्हटले– लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने इम्रान खान यांचे प्राण वाचवले आहेत. इम्रान खान यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. इम्रान खानच्या एका समर्थकाने या व्यक्तीला देवदूत म्हणत लिहिले- हा तोच देवदूत आहे ज्याने हल्लेखोराची बंदूक खाली खेचली होती.

काय म्हणाले आरोपी?

हल्लेखोराचे हे छायाचित्र पोलीस कोठडीत बनवलेल्या व्हिडिओतून घेतले आहे.
हल्लेखोराचे हे छायाचित्र पोलीस कोठडीत बनवलेल्या व्हिडिओतून घेतले आहे.

आरोपी पोलिस कोठडीत म्हणाला- मी हे (इम्रानवर गोळीबार) केले कारण इम्रान लोकांची दिशाभूल करत आहेत. ही बाब मला सहन झाली नाही आणि मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी फक्त इम्रान खान यांना मारायला आलो होतो. मला त्यांना ठार मारायचे होते कारण इथे अजान व्हायची आणि खान तिथे डीजे लावायचे. हे मला पटत नव्हते.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी म्हणाला- मी हा निर्णय अचानक घेतला. यासाठी अगोदर कोणतेही नियोजन नव्हते. ज्या दिवशी हा लाँग मार्च लाहोरहून सुरू झाला, त्यादिवशी मी इम्रानला सोडणार नाही, असे ठरवले होते. माझ्या मागे कोणी नाही, हे काम मी एकट्याने केले आहे. मी बाइकने आलो होतो, ती माझ्या काकांच्या दुकानात उभी केली होती.

इम्रान यांची प्रकृती स्थिर

कंटेनरवर काही लोकांमध्ये उभे राहून इम्रान समर्थकांना शुभेच्छा देत होते. त्यानंतर हल्लेखोराने गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या इम्रान यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे डॉक्टर फैसल सुलतान यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या पायाच्या हाडात गोळी लागली आहे. ती ऑपरेशनद्वारे काढले जाईल.

बातम्या आणखी आहेत...