आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांचीही हेरगिरी:पाकिस्तानने मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप लावला, इम्रान यांचा नंबर पेगासस लिस्टमध्ये, म्हटले - वैश्विक मुद्दा बनवू

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील 1,000 नंबर सर्व्हिलान्स लिस्टमध्ये

इस्त्रायली स्पायवेअर पेगाससकडून हेरगिरी करण्याच्या मुद्दय़ावरून संसद ते गल्लीपर्यंत देशात गदारोळ सुरू आहे. त्याचबरोबर हा मुद्दा पाकिस्तानमध्येही जोर धरत आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात असा दावा केला गेला आहे की हेरगिरी करण्यात आलेल्यांपैकी नंबरपैकी एक नंबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एकदा वापरलेला आहे.

हा अहवाल समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूजच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या आयटी मंत्री फवाद चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर पाक पंतप्रधानांच्या हेरगिरीचा मुद्दा उपस्थित करण्याची धमकी दिली आहे. चौधरी यांनी भारतावर हेरगिरीचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती समोर येताच हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतातील 1,000 नंबर सर्व्हिलान्स लिस्टमध्ये
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, भारतातील एक हजार आणि पाकमधील 100 नंबर सर्व्हिलान्स लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर इस्त्रायली फर्म एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीजने विकसित केले आहे. कंपनी हॅकिंग सॉफ्टवेअर बनवण्यात माहिर आहे. त्यांचा दावा आहे की बर्‍याच देशांच्या सरकारने हेरगिरीसाठी आपले सॉफ्टवेअर वापरले आहे.

रिपोर्टमध्ये दावा - मोदींचे मंत्रीही हॅकिंगच्या टार्गेटवर
मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केवळ कॉंग्रेसचे नेतेच नाही तर संसदेत सरकारचा बचाव करणारे केंद्रीय संस्कृतीमंत्री प्रह्लाद पटेल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही फोन हॅकिंगच्या निशाण्यावर होते. अहवालात नमूद केलेल्या नावांपैकी ही प्रमुख नावे आहेत.

  1. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींचा फोन नंबरही या लिस्टमध्ये होता.
  2. संसदेत सरकाराचा बचाव करणारे IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांचेही नाव या यादीमध्ये होते.
  3. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचेही नाव या यादीत आहे. त्यांनी 2014 मध्ये मोदींची ब्रांडिंग केली होती.
  4. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचेही नाव या यादीमध्ये आहे. लवासा यांनी 2009 च्या निवडणुकांमध्ये मोदी-शाह यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला असहमती दर्शवली होती.

परदेशातही झाली पत्रकारांची हेरगिरी
अहवालानुसार, जगातील वेगवेगळ्या भागातील पेगासस क्लायंट सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करणार्‍या किंवा त्याच्या निर्णयांवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर हेरगिरी करतात. आशियापासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांनी पेगाससच्या माध्यमातून पत्रकारांवर हेरगिरी केली किंवा त्यांना वॉच लिस्टमध्ये ठेवले. रिपोर्टमध्ये जगातील काही देशांचे नावही देण्यात आले आहेत, जेथे पत्रकारांवर सरकारच्या नजरा आहेत. या यादीमध्ये अव्वल क्रमांकाचे नाव आहे अझरबैजान, जिथे 48 पत्रकार सरकारी निगरानी यादीमध्ये होते. भारतात हा आकडा 38 आहे.

किती देशांमध्ये किती पत्रकारांवर नजर
अजरबैजान : देशात दमन आणि भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या कमीत कमी 48 पत्रकारांवर सरकार हेरगिरी करत आहे.
मोरक्को : सरकारच्या भ्रष्टाचारावर आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनावर टीका करणारे किमान 38 पत्रकार हेरगिरी यादीत आहेत.
UAE: फायनेंशियल टाइम्सचे एडिटर आणि द वॉल स्ट्रीट जर्नलचे इन्वेस्टिगेटिव्ह रिपोर्टरसह कमीत कमी 12 पत्रकारांची हेरगिरी केली जात आहे.
भारत : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकाकारांसह 38 पत्रकारांची हेरगिरी केली जात होती.
या व्यतिरिक्त मॅक्सिको, हंगरी, बहरीन, काजाकिस्तान आणि रवांडामध्येही सरकारांनी पत्रकारांची हेरगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...