आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या 400 कार्यकर्त्यांविरोधात मर्डर व दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर पोलिसांनी त्यांच्या 100 कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. ही कारवाई इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफच्या (PTI) कार्यकर्त्यांच्या रॅलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर करण्यात आली आहे.
या चकमकीत पीटीआयच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांविरोधातच गुन्हा दाखल केला होता. त्यावर पीटीआयच नेते फवाद चौधरी म्हणाले - पोलिसांनी आमच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्याऐवजी इम्रान व आमच्या 400 कार्यकर्त्यांवर हत्येचा गुन्हा दाखल केला.
चकमकीत PTI कार्यकर्ता अली बिलालची हत्या
8 मार्च रोजी पीटीआय कार्यकर्ते इम्रानच्या घरापासून रॅली काढणार होते. त्यामुळे लाहोरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. त्यानंतर जमान पार्कबाहेर जमलेले पीटीआय कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुरासर पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर केला. चकमक वाढत असल्याचे पाहून इम्रान यांनी रॅली मागे घेण्याची घोषणा केली होती.
PTI च्या माहितीनुसार, या चकमकीत पोलिसांनी अली बिलाल नामक कार्यकर्त्याची हत्या केली. तसेच अनेक कार्यकर्ते जखमी झाले. दुसरीकडे, FIR नुसार, PTI च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात 11 पोलिस जखमी झाले.
11 महिन्यांत इम्रान यांच्यावर 80 वा गुन्हा
इम्रान म्हणाले - सरकार पंजाबमधील निवडणुका पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधत आहे. यासाठी त्यांना मृतदेहांची गरज आहे. पोलिसांनी आमच्या 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सरकार व त्यांच्या नेत्यांचा वाईट हेतू आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शाहबाज शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष सत्तेत आल्यानंतर 11 महिन्यांत इम्रान यांच्यावर दाखल झालेला हा 80 वा गुन्हा आहे.
IG नी स्थापन केली चौकशी समिती
PTI ने या प्रकरणी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नकवी यांच्यासह गृहमंत्री राणा सनाउल्लाह, पंजाबचे IG उस्मान अन्वर व लाहोर पोलिसांचे प्रमुख बिलाल कामयान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, आयजींनी या प्रकरणी 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.
रविवारी अटकेला घाबरून पळून गेले होते इम्रान खान
गत रविवारी इस्लामाबाद व लाहोर पोलिस तोशाखाना प्रकरणात इम्रान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पण त्यावेळी इम्रान त्यांना घरी सापडले नव्हते. अटक टाळण्यासाठी इम्रान यांनी आपल्या समर्थकांना जमान पार्कबाहेर गोळा होण्याचे निर्देश दिले होते. जमानला 4 मार्ग जातात. या चारही रस्त्यांवर त्यांचे समर्थक लाठ्याकाठ्या घेऊन उभे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.