आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि काही विरोधी नेत्यांवर देशद्रोहाच्या आरोपांवरुन पाकिस्तानमध्ये राजकारण सुरू आहे. नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) चा आरोप आहे की, इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय)ने नवाज यांच्यावर केस दाखल केली आहे. त्याचबरोबर स्वत: पंतप्रधान इम्रान खानही याचा इन्कार करत आहेत. इम्रान यांच्यानुसार, जेव्हा ते वाढदिवसानिमित्त केक कापत होते तेव्हा त्यांना नवाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.
पीटीआयने सत्ता गाजवली
नवाज यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाकिस्तानचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. सरकारचे काही मंत्रीही यावर नाराज आहेत. जवळपास प्रत्येक विभागात या घटनेविरोधात निषेध झाल्यानंतर इम्रान सरकार आता या प्रकरणातून हात वर करत आहे. नवाज यांच्याविरोधात एका व्यक्तीने केस दाखल केली असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. तसेच आमचा त्यात काही संबंध नाही. हा गुन्हा दाखल झालेल्या लाहोरचे पोलिसही एका व्यक्तीच्या वतीने हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत आहेत.
काय म्हणाले इम्रान?
मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. ‘द ट्रिब्यून’ च्या वृत्तानुसार, या बैठकीत इम्रान म्हणाले- लोक म्हणत आहेत की माझ्या सांगण्यावरून नवाज यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला होता. पण, मी माझ्या वाढदिवसाचा केक कापत असताना एफआयआरबद्दल मला माहिती मिळाली. इम्रान यांनी मंत्र्यांना हे सांगितले.
विरोधक एकत्र, सरकार संकटात
पाकिस्तानमध्ये संपूर्ण विरोधक सरकारविरोधात एक झाले आहेत. यासाठी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) नावाची एक नवीन संस्था तयार केली गेली आहे. मौलाना फजल-उर-रहमान यांना या संघटनेचे नेता केले गेले आहे. या संघटनेच्या स्थापनेपासून विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यातच आता नवाझ शरीफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता ही सरकारची अडचण ठरत आहे. इम्रान यांच्या काही मंत्र्यांचादेखील या कारवाईस तीव्र विरोध आहे. इम्रान स्वत: असे म्हणत आहेत की, राजकीयदृष्ट्या बदला घेण्याची त्यांची भावना नाही.
या नेत्यांविरोधात एफआयआर
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे पंतप्रधान राजा, मरियम नवाज शरीफ, अयाज सादिक, माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी, परवेझ रशीद, ख्वाजा आसिफ, राणा सनाउल्ला आणि इकबाल जफर या नेत्यांच्या विरोधात एफआईआर दाखल करण्यात आला आहे. असे म्हटले जाते की बदर राशिद नावाच्या व्यक्तीने नवाज यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. तो इम्रान यांच्या पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. इम्रान यांचे मंत्री शिबली फराज म्हणाले- एफआयआर कोणीही दाखल करू शकतो. तुम्ही माझ्याविरूद्ध देखिल हे करू शकता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.