आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी महिला आमदारांच्या हाणामारीचा VIDEO:पंजाब विधानसभेत एकमेकींना धक्काबुक्की करत केस उपटले, नवा मुख्यमंत्री निवडण्यावरून झाला वाद

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान रविवारी पंजाब विधानसभेत महिला आमदारांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. सरकार आणि विरोधी पक्षाच्या महिला आमदारांत चांगलाच वाद पाहायला मिळाला. आरडाओरड करत महिला आमदारांनी एकमेकींना धक्काबुक्की करत केसही उपटले.

एका पाकिस्तानी पत्रकाराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. यादरम्यान पुरुष आमदारांनी मध्ये येऊन महिलांना हाणामारी करण्यापासून रोखले. पोस्टनुसार, पंजाबचा नवा मुख्यमंत्री निवडण्यावरून महिला आमदारांमध्ये वाद झाला.

पंजाबचे राज्यपाल मोहम्मद सरवर यांची रविवारी सकाळी इम्रान खान यांनी हकालपट्टी केली, त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला.
पंजाबचे राज्यपाल मोहम्मद सरवर यांची रविवारी सकाळी इम्रान खान यांनी हकालपट्टी केली, त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला.

पंजाब विधानसभा विसर्जित होऊ शकते

पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर आता पंजाब विधानसभाही विसर्जित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबचे नवे राज्यपाल उमर सरफराज चीमा हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांना पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री होण्यास सांगू शकतात.

दरम्यान, उमर सरफराज चिमा यांना इस्लामाबादला बोलावण्यात आले असून ते आज इम्रान खान यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणाची बारकाईने माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, इम्रान खान चीमा यांना पुढील कारवाईबाबत निर्देश देतील. इम्रान खानने बुजदार आणि पीटीआयचे खासदार महमुदूर रशीद यांनाही भेटण्यासाठी इस्लामाबादला बोलावले आहे.

पंजाबचे नवे गव्हर्नर उमर सरफराज चीमा यांना इस्लामाबादला बोलावण्यात आले असून ते आज इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.
पंजाबचे नवे गव्हर्नर उमर सरफराज चीमा यांना इस्लामाबादला बोलावण्यात आले असून ते आज इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.

चीमा रविवारीच राज्यपाल झाले

पंजाबचे माजी राज्यपाल चौधरी मोहम्मद सरवर यांना रविवारी सकाळी पदावरून हटवण्यात आले, त्यानंतर पीटीआय नेते उमर सरफराज चीमा यांना पंजाबचे राज्यपाल बनवण्यात आले. पाकिस्तान सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तान मुस्लिम लीग (कैद-ए-आझम) पक्षाचे नेते चौधरी परवेझ इलाही यांच्या सांगण्यावरून सरवर यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात आले.

त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर काही वेळातच सरवर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक बड्या नेत्यांसमोर असूनही, इम्रान खान यांनी उस्मान बुझदार यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली कारण तेच एकमेव नेते आहेत, जे नवीन पाकिस्तानचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...