आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Sexist Comment | Pak PM Imran Khan, Imran Khan Controversial Comment Over Women, Imran Khan Controversial Comment Rape Victim

इम्रान खान यांचे वादग्रस्त वक्तव्य:'महिलांनी कमी कपडे घातल्यामुळे पुरुष आकर्षित होतात, यामुळेच लैंगित अत्याचार वाढतो'

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानात दररोज 11 बलात्काराच्या घटना

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दोन महीन्यांपूर्वी लैंगित हिंसेवर वादग्रस्त वक्तव्य दिल्यानंतर वादात अडकलेल्या इम्रान यांनी पुन्हा एकदा महिलांविरोधात वक्तव्य केले आहे. त्यांनी लैंगित अत्याचारास महिला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच, महिलांनी पूर्ण कपडे घालावे असा सल्लाही दिला आहे. महिलांनी कमी कपडे घातल्यामुळेच लैंगित अत्याचार घडतो, असे ते म्हणाले आहेत.

HBO एक्सिओसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना पाकिस्तानातील बलात्कार पीडितांवर आरोप करण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर इम्रान म्हणाले की, 'महिलांनी कमी कपडे घालण्याने पुरुषांवर परिणाम होतो.' याशिवाय, बलात्कार पीडितांवर केलेल्या जुन्हा एका वक्तव्याची पाठराखण करताना म्हणाले की, मी कधीच बलात्कार पीडितांवर वक्तव्य केले नाही. बुरखा घातल्याने पुरुषांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो, इतकचं म्हटलं होतं, असेही ते म्हणाले.

यापूर्वीही केलेत वादग्रस्त वक्तव्य
इम्रान यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यापूर्वी देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांवर वक्तव्य करताना त्यांनी देशातील महिलांना बुरखा घालण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी देशातील अश्लीलतेसाठी भारत आणि युरोपला जबाबदार ठरवले होते.

पाकिस्तानात दररोज 11 बलात्कार
अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात दररोज 11 बलात्काराच्या घटना होतात. मागील सहा महिन्यात पाकिस्तानात 22 हजार बलात्काराच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...