आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाद...हा जवळपास सर्वच राजकारण्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असतो. पाक पंतप्रधान इम्रान खान हे ही याला अपवाद नाहीत. त्यांचेही आयुष्य अनेक 'रंगबेरंगी' वादांनी भरलेले आहे. तीनवेळा बोहल्यावर चढलेल्या इम्रान यांच्या प्रेमाच्या यादीत बॉलिवूडपासून जगभरातील श्रीमंत महिलांचा समावेश आहे. अशीच एक महिला आहे...सीता व्हाइट. ही महिला इम्रान यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्कँडलचे कारण ठरली.
गोष्ट 1987-88 ची आहे. इम्रान त्यावेळी क्रिकेट जगतात फार लोकप्रिय होते. लव्ह लाइफमुळे माध्यमांत त्यांची प्रतिमा एखाद्या प्लेबॉय सारखी होती. दुसरीकडे, सीताने इटलीचे फोटोग्राफर फ्रेन्सेस्को व्हेंच्युरी यांच्याशी लग्न केले होते. इम्रान व तिची भेट लंडनच्या जेरमिन स्ट्रीट नाईट क्लबमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. या दोघांचे काही महिने अफेयर सुरू राहिले. पण, त्यानंतर अचानक ते एकमेकांपासून दूर झाले.
इम्रान यांना हवा होता मुलगा
इम्रान व सीता 1991 मध्ये शेवटचे भेटले. त्यानंतर त्यांना केव्हाच एकत्र पाहण्यात आले नाही. सीताच्या दाव्यानुसार, इम्रान यांना त्यांच्यापासून मुलगा हवा होता. पण, त्यांना जेव्हा आपण मुलीचे वडील होत असल्याचे कळले, तेव्हा ते खूप निराश झाले. इम्रान यांच्या मते, मुलगी क्रिकेट खेळू शकत नाही. त्यामुळे त्यांनी सीताला गर्भपात करण्याचाही सल्ला दिला. पण, सीता त्यासाठी केव्हाच तयार झाल्या नाही.
राजकारणासाठी मुलीचा स्विकार करण्यास नकार
इम्रान यांची कन्या टायरियन खान व्हाइट हिचा जन्म 15 जून 1992 रोजी झाला. सीताने सलग 3 वर्षे आपल्या मुलीच्या वडिलांचाी ओळख लपवून ठेवली. दुसरीकडे, त्यावर्षी प्रकाशित झालेल्या इम्रान यांच्या आत्मचरित्रातही याचा कुठेच उल्लेख नव्हता. पण, 1995 साली क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात आलेल्या इम्रान यांच्या या स्कँडलची पोल खूलली.
त्यानंतर इम्रान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी ब्रिटनचे अब्जाधीश जेम्स गोल्डस्मिथ यांची कन्या जेमिमा हिच्याशी लग्न केले. त्यावेळी ते पाकच्या राजकारणात आपले नशीब आजमावत होते. या प्रकरणी नाचक्की होण्याच्या भीतीने त्यांनी टायरियन आपली कन्या असल्याची गोष्ट केव्हाच मान्य केली नाही. त्यानंतरही त्यांना इस्लामच्या नावाने जनतेचा रोष सहन करावा लागला.
अमेरिकेत हरले खटला
सीता यांनी इम्रान हेच आपल्या मुलीचे वडील आहेत, हे सिद्ध करण्याचा चंग बांधला होता. यासाठी 1997 च्या अखेरीस त्यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित कोर्टात धाव घेतली. इम्रान यांनीया सुनावणीपासून अंतर राखल्याने न्यायालयाने इम्रान हेच टायरियन यांचे वडील असल्याचे स्पष्ट केले. पण, इम्रान यांनी आजपर्यंत टायरियनचे पालकत्व स्विकारले नाही.
जेमिमा बनल्या टायरियन यांच्या दुसऱ्या माता, इम्राननेही दिली साथ
सीता यांचा मृत्यू वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी 2004 मध्ये झाला. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी टायरियनची जबाबदारी इम्रान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा यांच्याकडे सोपवली होती. तेव्हापासूनच जेमिमा टायरियनला आपली मुलगी मानतात. जेमिमा व इम्रान यांच्या दोन्ही मुलांचेही तिच्याशी चांगले संबंध आहेत.
सीताच्या मृत्यूनंतर इम्रान यांनीही टायरियनचा स्विकार केला. तेव्हा ते म्हणाले -टायरियनला हवे असेल तर ती आमच्यासोबत लंडनमध्ये राहू शकते. जेमिमा तिची कायदेशीर पालक आहे. आम्ही तिचे पालकत्व स्विकारण्यास तयार आहोत.
2018 मध्ये पुन्हा चर्चेत आला होता मुद्दा
पाक संविधानातील कलम 62 नुसार, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे चारित्र्य स्वच्छ असले पाहिजे. 2018 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी इम्रान यांनी आपल्या उमेदवारी अर्जात टायरियन हिचा उल्लेख केला नव्हता. विरोधकांनी या प्रकरणी टीकेची झोड उठवली होती. हे प्रकरण इस्लामाबाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. इम्रान यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अब्दुल वहाब बलोच यांनी याप्रकरणी इम्रान यांना कोर्टात खेचले होते. पण, त्यांनी त्यानंतर इम्रान यांच्या पक्षात प्रवेश केला व हे प्रकरण निकाली निघाले. या प्रकरणी गतवर्षी झालेल्या एका सुनावणीत न्यायालयान इम्रानवरील सर्वच आरोप फेटाळून लावले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.