आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran's Game Will Not Work, If Supreme Court Rules Wrong, Imran Will Be Tried For Treason Like Musharraf\ Marathi News

पाकिस्तानातील तज्ज्ञांचे मत:संसद भंग करणे बेकायदेशीर, इम्रानचा खेळ चालणार नाही, सुप्रीम कोर्टाने निर्णय चुकीचा ठरवल्यास इम्रानविरोधात देशद्रोहाचा खटला

पाकिस्तान4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष सत्ता मिळवण्याच्या पूर्ण तयारीत होता. मात्र, संसद विसर्जित होताच विरोधी पक्षाचे नेते चांगलेच भडकले आणि अध्यक्षांच्या खुर्चीचा ताबा घेतला. शाहबाज शरीफ यांना पीएमही घोषित केले. तथापि, शाहबाज म्हणाले, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू.

सुप्रीम कोर्टाची स्वत:हून दखल
संसद विसर्जित करण्याच्या प्रक्रियेवर सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली. रविवारी सुनावणी घेतली. सरकारकडून सोमवारपर्यंत उत्तर मागितले. कार्यवाही असंविधानिक आहे, असे कोर्टाला वाटले तर निवडणूक होणार नाही.

तर सरकार पडले असते...
पाक संसदेत रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान होते. इम्रानकडे १४२ खासदार आहेत. बहुमतासाठी १७२ आवश्यक आहेत. मात्र, मतदानापूर्वीच राष्ट्रपतींनी संसद विसर्जित केली. आता ९० दिवसांत निवडणूक आवश्यक आहे.

विरोधकांचा खेळ संपवणे गरजेचे होते : इम्रान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हाय व्होल्टेज राजकीय नाट्य रचत विरोधकांना सत्तेपासून रोखले. नॅशनल असेंब्लीत स्पीकरने अविश्वास प्रस्ताव रद्द ठरवल्यानंतर राष्ट्रपतींनी संसद भंग केली. हे सर्व घटनाबाह्य ठरते. कारण अल्पमतात आलेले सरकार संसद भंग करू शकत नाही किंवा अविश्वास प्रस्तावावर मतदानही रोखू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी मतदान घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, घटनाबाह्य निर्णयाबद्दल जनरल परवेज मुशर्रफ यांच्याप्रमाणे इम्रान यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालू शकतो.
संसद विसर्जित झाल्यानंतर इम्रान यांनी हा फोटो ट्वीट केला. नंतर म्हणाले, नव्या सरकारचा निर्णय जनता करेल. विरोधकांचा खेळ संपला.

झाले असते. पण आता ते काही दिवसांसाठी पुढे ढकलले गेले. घटनातज्ज्ञ मोहंमद उस्मान यांनी भास्करला सांगितले की, आता प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे आहे. तेथे सोमवारी अॅटर्नी जनरल यांना उत्तर द्यावयाचे आहे. ते अमेरिकी हस्तक्षेपाचा उल्लेख करून प्रकरण गंभीर बनवण्याचा प्रयत्न निश्चितच करतील. परंतु कोर्टाकडून संसद भंग करण्याची कार्यवाही उचित ठरवण्याचा असा कोणताच कायदा नाही. पण इम्रान यांच्याकडे बहुमत असते तर कोर्टाने त्यांना नक्कीच दिलासा दिला असता. मात्र, इम्रान यांचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे, हे अगदी स्पष्ट आहे.

विरोधकांकडे ३ पर्याय : न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा
निकालाची वाट पाहू,असे विरोधक म्हणत आहेत. मात्र, विरोधकांतील काही पक्षांना लष्कराचा थेट हस्तक्षेप हवा आहे. निवडणुकीची तयारी सुरू करा
इम्रान खान यांना निवडणूक हवी आहे. विरोधकांना ते नको आहे. त्यांना सरकार पाडून सत्ता हवी आहे.

लष्कराची मदत घ्यावी : पाकिस्तानमध्ये स्थिती बिघडल्यास लष्कराच्या मदतीने विरोधक आणीबाणी जाहीर करू शकतात. मात्र, तरीही विरोधकांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

भारताची चिंता वाढली : पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर भारतासाठी समस्या तयार झाल्या आहेत. गेल्या ५० वर्षांत अशा अनेक घटना घडल्या ज्यात पाकिस्तानी लष्कराने निवडून आलेल्या सरकारला बाजूला सारत थेट वा अप्रत्यक्षरित्या ताबा मिळवला होता. आपल्या नागरिकांचे लक्ष मूळ मुद्‌द्यांपासून भरकटवण्यासाठी सीमेवर अनेकदा चिथावणी देण्यात आली. भारतीय तज्ज्ञांना आता हीच चिंता आहे. पाकिस्तानी लष्कर काही ना काही चिथावणी देऊ शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण तज्ज्ञ अलर्ट झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...