आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहबाज सरकारची चाल:इम्रान यांच्या वाढत्या लोकप्रियतेने नवाझ यांच्या घरवापसीत अडचणी

इस्लामाबाद / नासिर अब्बासएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात थंडीच्या आगमनासह राजकीय पारा तापत आहे. माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना लाँग मार्चमुळे मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे शाहबाझजसरकारला नवाझ शरीफ यांची आठवण येत आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान यांनी २५ पैकी २२ जागा जिंकल्या आहेत.

सार्वत्रिक निवडणूक लवकर घ्यावी यावर इम्रान अडून बसले आहेत. निवडणुकीसाठी सत्ताधारी पीएमएल-एनला लंडन निवासी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गरज भासत आहे. नवाझ लवकरच परत येणार, असा दावा पीएमएल-एनचे नेते करत आहेत. पंजाबमध्ये पीटीआय आघाडीचे सरकार असेपर्यंत नवाझ यांचे परतणे शक्य नाही. शहबाझ सरकार पंजाबमधील सरकार पाडणार, त्यानंतरच शरीफ परततील. पंजाब सरकारच्या विरोधात डिसेंबरच्या आधी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

नवाझ परतले तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना पराभूत करणार : इम्रान लाँग मार्चच्या पाचव्या दिवशी मंगळवारी गुजरानवाला येथे सभेत बोलताना पीटीआयचे प्रमुख इम्रान खान म्हणाले, की ‘नवाझ शरीफ मी आपल्याला आव्हान देत आहे, आपण परत आलात तर मी तुमच्याच मतदरसंघात तुम्हाला पराभूत करणार.’ याचा अर्थ असा काढला जात आहे, की नवाझ यांनी निवडणूक लढवली तर इम्रान त्यांचा सामना करतील. लाँग मार्चचे प्रसारण करण्यास सरकाने टीव्ही चॅनेल्सना प्रतिबंध घातले आहेत, असा आरोप इम्रान यांनी केला. पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ यांनी पलटवार केला. त्या म्हणाल्या, की इम्रान यांनी अधिकार गमावला आहे. ते राजकीय दहशतवादी आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले जाऊ नये.

नवाझ परतल्यानंतर जेलमध्ये जाऊ देणार नाही : मंत्री जावेद नवाझ शरीफ यांचे निरटवर्तीय आणि शहबाझ यांचे कॅबिनेट मंत्री जावेद लतीफ म्हणाले, की नवाझ यांच्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध रद्द करण्यासाठी सरकार दुरुस्त्या करणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक बाबींनुसार नवाझ यांची घरवापसी होईल. पुराव्यांअभावी न्यायालयाने मरियम यांना निर्दोष ठरवले, त्यामुळे नवाझही निर्दोष असल्याचे स्पष्ट आहे. नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर आम्ही त्यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही. न्यायासाठी आम्ही पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहोत. आमचे वकील कायदेशीर बाबींची पूर्तता करत आहेत. नवाझ शरीफ लवकरच मायदेशी परत येतील.

निकटवर्तीयाला लष्करप्रमुख बनवू इच्छितात नवाझ शरीफ राजकीय विश्लेषक नजम सेठी यांचे यांना वाटते, की नवाझ शरीफ घरवापसीसाठी तयार आहेत, मात्र त्यांना लष्करप्रमुखांच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. आपल्या निकटवर्तीयाला लष्करप्रमुख बनवण्याची नवाझ यांची योजना आहे. त्यामुळे घरवापसीनंतर त्यांना लष्कराचे समर्थन मिळेल. विद्यामान लष्करप्रमुख कमर बाजवा याचा महिन्यात निवृत्त होणार आहेत. सेठी यांच्या मतानुसार, नवाझ यांच्या घरवापसीपूर्वी वातावरण निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान शहबाझ आणि त्यांचे पुत्र हमजा शहबाझ यांच्याविरोधात दाखल प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मरियम यांचे पासपोर्ट त्यांना परत करण्यात आले आहे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...