आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याच्या विराेधात त्याचा पक्ष तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी तर समर्थकांच्या निदर्शनांमुळे अनेक शहरे ठप्प झाली हाेती. इस्लामाबाद विमानतळाकडे जाणारे महामार्ग व लाहाेर-पेशावरला राजधानीशी जाेडणारे रस्ते बंद केले. या शहरांपासून तुटल्यामुळे आता राजधानी इस्लामाबादची शब्दश: काेंडी झाली आहे. निदर्शकांनी राजधानी प्रवेश करू नये यासाठी पाेलिस त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यांना राेखण्याचे प्रयत्न केले जात हाेते. तत्पूर्वी इम्रान यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी पंजाब प्रांताची राजधानी लाहाेरमध्ये राज्यपालांच्या निवासस्थानावर हल्ला करून प्रवेशद्वार ताेडले. फैसलाबादमध्ये संतप्त पीटीआय कार्यकर्त्यांनी गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या घरावरही हल्ला केला आणि सरकारविराेधी घाेषणा दिल्या. इस्लामाबादचे रहिवासी माेहंमद अली ‘भास्कर’ला म्हणाले, गेल्या काही वर्षांत इस्लामाबादमधील जीवन कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपली राजकीय पाेळी भाजून घेण्यासाठी इस्लामाबादला धरणे-निदर्शनांच्या माध्यमातून वेठीस धरू लागला आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात पाकिस्तानातील राजकीय चित्र भयंकर हिंसक पाहायला मिळू शकते. इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यामुळे देशावर राजकीय संकट आेढवून उलथापालथ आणखी वाढू शकते. पाकिस्तानसाठी हा महिना म्हणूनच महत्त्वाचा ठरताे. याच काळात देशाचे नवे लष्करप्रमुखही निवडले जातील.
लष्करी मुख्यालय रावळपिंडी सर्व बाजूंनी बंद पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी देखील रावळपिंडीत जाेरदार िनदर्शने केली. रावळपिंडीत लष्कराचे मुख्यालय आहे. प्रशासनाने येथे शाळा-महाविद्यालये दाेन दिवस बंद ठेवली आहेत. इम्रान यांच्या समर्थकांनी शहरात बारा ठिकाणी निदर्शने केली आहेत. मुरी मार्ग, आयजीपी राेड इत्यादी उच्चवर्गीय वसाहतींचाही त्यात समावेश आहे. इस्लामाबादच्या केंद्रीय पाेलिसांनी एम-१, एम-२ माेटर-वे खाली करण्यासाठी गृहसचिवांना उशिरा रात्री पत्र पाठवण्यात आले .
गृहमंत्र्यांनी मागितली माफी गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी इस्लामाबादमध्ये आंदाेलनामुळे गैरसाेय हाेत असल्याबद्दल सामान्य जनतेची माफी मागितली आहे. रस्ते सुरू करण्यासाठी पोलिसांचा पर्याय असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची मदत घेऊन रस्ते मोकळे केले जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अखेर एफआयआर दाखल झाला इम्रान यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. सुप्रीम काेर्टाने याप्रकरणी पंजाब पाेलिसांना २४ तासांची सवलत दिली हाेती. ताब्यात घेतलेल्या नवीद माेहंमद बशीरचे नाव मुख्य आराेपी म्हणून नाेंदवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.