आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल एडव्हायजर शाहबाज गिल यांनी शनिवारी दावा केला की, माजी पंतप्रधान नवाज शरीफ भारताशी मिळालेले आहेत. गिल म्हणाले, 'मी असे म्हणत नाही की, नवाज शरीफ हे पाकिस्तान विरोधी आहेत, मात्र ते एक छोट्या विचारांचे बिझनेसमन आहेत. एक पाकिस्तानी ट्रेडर भारतीय पंतप्रधानांना भेटेल का, पण नवाज शरीफ यांनी पंतप्रधान असतानाही नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोदींची गुपचूप भेट घेतली होती. त्यांनी याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देखील दिलेली नव्हती.'
दुसरीकडे, शरीफ यांना ब्रिटनमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ब्रिटेन सरकारने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितले की ते पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणासंदर्भात हस्तक्षेप करू शकत नाहीत.
नवाज यांचे भारतीयांसोबत व्यावसायिक संबंध - गिल
गिल म्हणाले की,सरकारला या विषयाची माहितीही नाही की, नवाज शरीफ यांनी नुकतीच लंडन येथील एका देशाच्या दूतावासात मीटिंग केली होती. पठाणकोटवरील हल्ल्यानंतर भारताचे व्यापारी सज्जन जिंदल आणि नवाज यांनी एक सारखे विधाने केली होती, असे ते म्हणाले. नवाज आणि त्याच्या कुटुंबाचे भारतीयांशी खासगी व्यावसायिक संबंध आहेत. याचा त्यांना फायदा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी इम्रान म्हणाले होते की नवाज भारताबरोबर मिळून पाकिस्तानचे सैन्य कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून नवाज लंडनमध्ये आहेत
मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून 70 वर्षीय नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. लाहोर हायकोर्टाने त्यांना केवळ चार आठवड्यांसाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली होती, परंतु ते अद्याप परतलेले नाहीत. कोर्टाकडून वारंवार समन्स बजावूनही नवाज हजर झाले नाहीत. हे पाहताच त्यांना फरार घोषित करण्यात आले. लंडनमधील पाकिस्तान दूतावासामार्फत नवाजविरोधात वॉरंट काढण्यास कोर्टाने परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.