आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेलबर्नहून भास्करसाठी अमित चौधरी
ग्रेवाल आटा, ग्रेवाल घी, ग्रेवाल डाळी व अनेक उत्पादने... ही नावे ऑस्ट्रेलियात घरोघरी ओळखली जातात. २० वर्षांत हे चार भाऊ ऑस्ट्रेलियातील मोजक्या अब्जाधीशांमध्ये आेळखले जाऊ लागले. याबाबत आज्ञाकार सिंह सांगतात, स्वत:च्या पिकांचे नशीब ठरवण्याची ताकद शेतकऱ्यांत आहे. अट एकच -सरकारने साथ द्यावी. ते स्वत: सांगताहेत आपली कथा...
यशाचे रहस्य : कठीण काळात कुटुंब एकत्र
गोष्ट १९८८ ची. लुधियानातील मनसुरात चार भावांची २० एकर शेती. भागायचे नाही म्हणून मी रेल्वे कारखान्यात मेकॅनिकचे काम सुरू केले. लहान भाऊ हरजस न्यूझीलंडला गेला. नंतर १९९० मध्ये मीही गेलो. टॅक्सी चालवली, मजुरी केली, कारखान्यात राबलो. दोन भाऊही आले. काम चांगले सुरू होते, मात्र मनात शेती घर करून होती. १९९७ मध्ये शेतीत नशीब आजमावण्यासाठी ऑस्ट्रेलियात आलो. जम न बसल्याने न्यूझीलंडला परतलो. २००० मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियात गेलो व १८ एकर शेती घेतली. द्राक्षे लावली. चांगला नफा झाला. शेतीचे तुकडे घेतले. नफा वाढल्यानंतर मेलबर्नपासून ५०० किमी लांब मिलदुरात ३ हजार एकर शेती घेतली. गहू लावला. ऑस्ट्रेलियात भारतातून पीठ आयातीस बंदी होती म्हणून पीठ करण्यासाठी यंत्र घेतले. काम सुरू होताच आयातीवरील बंदी उठली. पीठ तयार होते, मात्र कोणी विकत घेत नव्हते. म्हणून दुकानदारांकडे गेलो. आता प्रत्येक तासाला एक टन पीठ तयार करतो. चीनला द्राक्ष निर्यात करतो. ब्ल्यू बेरी, रेडी बेरीची शेती सुरू केली. कुटुंब एकत्र असल्यानेच यश मिळाले. चार मुलीही शेती करतात.
भारत व ऑस्ट्रेलियातील शेतीत काय आहे फरक?
- आज्ञाकार सिंह यांच्यानुसार ऑस्ट्रेलियात सरकार पीक विकत घेत नाही. एमएसपीही नाही, मात्र, सरकार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देते. योग्य किंमत मिळवून देते. नुकसान झाल्यास भरपाई खात्यात जमा होते.
- ऑस्ट्रेलियात शेतकऱ्यांनी पीक विकण्यासाठी सोसायटी स्थापन केली आहे. योग्य दाम न मिळाल्यास शेतकऱ्यांकडे साठा करण्याची सोय आहे. भारतातही शेतकरी एकत्र येत पीक घेऊ शकतात. बाजाराच्या मागणीनुसार पिकावर प्रक्रिया करून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.