आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवर तणाव वाढतो आहे:2020 मध्ये जगात सुमारे 8 लाख लोकांची आत्महत्या, 12 लाखांचा आत्महत्येचा प्रयत्न

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

८०० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या पृथ्वीवर तणाव वाढतो आहे. आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. २०२० मध्ये जगात सुमारे ८ लाख लोकांनी आत्महत्या केल्या, तर १२ लाख लोकांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेच्या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वेक्सनर मेडिकल सेंटरमधील ‘द सुसाइड अँड ट्रॉमा रिडक्शन इनिशिएटिव्ह’चे क्लिनिकल डायरेक्टर जस्टिन बेकर म्हणतात, आत्महत्या करण्याचा निर्णय आत्महत्येच्या ५ ते १५ मिनिटांच्या आत घेतला जातो. तत्सम परिस्थितीत एक व्यक्ती आत्महत्या करते तर दुसरी करत नाही. ‘न्यूपोर्ट हेल्थकेअर सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन’चे संचालक मायकेल रोएस्के म्हणतात, मरण्याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, या नऊ गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आत्महत्येची प्रवृत्ती ओळखू शकता
हताशपणा : रोएस्के म्हणतात, जर तुमच्या आजूबाजूला कुणी हताशपणाबाबत बोलत असेल, त्याला भविष्याचा मार्ग दिसत नसेल तर आत्महत्येचा विचार येऊ शकतो.

{वारंवार मूड बदलणे : एखाद्याचे वागणे अचानक बदलते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सहसा रागाने चिडली असेल; परंतु नंतर अचानक खूप आनंदी दिसली तर त्याने टोकाचा निर्णय घेतला असेल. ही एक धोकादायक स्थिती आहे.

{मृत्यू किंवा प्राणघातक गोष्टींबद्दल अधिक बोलणे : एखाद्याला अचानक मृत्यू किंवा शस्त्रास्त्रांमध्ये जास्त रस निर्माण होतो. तेव्हा त्याची आवड संगीत किंवा अशा भिन्न गोष्टींत असते. तेव्हा ती धोक्याची बाब असू शकते.

यातना किंवा आघात : एखादी व्यक्ती आघातातून गेली आहे. ती पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत असेल तर ती आयुष्य संपवण्याचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यसनाधीनता किंवा मानसिक आजार : व्यसन हेदेखील आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. यातून या घटनाही घडल्या आहेत.

असाध्य रोग : असा रोग ज्यात एखाद्याला दीर्घकाळ वेदना होत असतात. मानसशास्त्रज्ञ मायकेल रोएस्के म्हणतात, जेव्हा रुग्ण असे म्हणू लागतात की मला आता सहन होत नाही.

कुटुंबातील कुणीतरी आत्महत्या केली आहे : रोएस्के म्हणतात, जर कुटुंबातील कुणी आत्महत्या केली असेल तर त्या कुटुंबातील कुणीतरी आत्महत्या करण्याची शक्यता वाढते.

आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या : नोकरी गमावणाऱ्या, व्यवसायात नुकसान किंवा कौटुंबिक तणावातून जाणाऱ्या लोकांकडे अधिक लक्ष द्या.

बोला, समस्या समजून घ्या, मानसोपचार तज्ज्ञाला भेटा
मानसशास्त्रज्ञ बेकर व रोएसके म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुणी असामान्य दिसत असेल तर त्याच्याशी बोला. पण आत्महत्येचा उल्लेख करू नका. त्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला कशाची चिंता आहे? परिस्थिती असामान्य वाटत असल्यास मानसोपचार तज्ज्ञांना भेटा.

बातम्या आणखी आहेत...