आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याग:अमेरिकेत वयस्कर मुलांसाठी 70% आई-वडिलांचा आर्थिक त्याग, 50% त्यांची कर्जफेडही करताहेत!

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयस्कर मुलांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे कठीण आहे, असे आई-वडिलांना वाटते. आई-वडिल वयस्कर मुलांच्या मदतीसाठी स्वत:चे उत्पन्न व बचतही खर्च करून टाकत आहेत. न्यूयॉर्कची वित्तीय सेवा कंपनी बँकरेटच्या म्हणण्यानुसार वयस्कर मुलांसाठी ७० टक्के आई-वडीलांनी मदत करण्यासाठी आर्थिक त्याग केला आहे. ५० टक्के आई-वडील मुलांसाठी आणीबाणीच्या परिस्थितीसाठी केलेली बचतही खर्च करत आहेत किंवा मुलांची कर्जफेडही करू लागले आहेत. वयस्कर मुलांना सहकार्य करताना आपले निवृत्तीचे पैसेही संपून जात आहेत, असे ४३ टक्के जणांना वाटते. बेबी बूमर्स (६३ ते ७५ वर्षीय आई-वडील) यांच्या तुलनेत जेन एक्स (४३ ते ५८ वर्षीय आई-वडील) मुलांच्या मदतीसाठी ३६ टक्के जास्त शक्यता ठेवतात. बँकरेटचे वरिष्ठ विश्लेषक टेड रॉसमॅन म्हणाले, तरूण-विद्यार्थी कर्ज व घरांच्या वाढत्या किंमतींशी झुंज देत आहेत. परंतु आई-वडिलांनी त्यांना गरजेपेक्षा जास्त मदत केल्यास ते स्वत:ची आर्थिक सुरक्षा अडचणीत आणत आहेत, असे समजावे. तरूण तसेच जुन्या अशा दोन्ही पिढ्यांनुसार २० व्या वर्षापासून सेलफोन, क्रेडिट कार्ड, कार विमा घेण्यास सुरूवात करायला हवी. जुन्या पिढीच्या तुलनेत नवीन पिढीची स्थिती वाईट आहे. जेन जीचे लोकांना (१९९३ नंतर जन्मलेले) २२ व्या खर्चाचा भार घ्यावा असे वाटते.

सहानुभूती ठेवा, पण मदत निश्चित काळापर्यंत करावी रॉसमॅन म्हणाले, मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेणे बंद करावे याबद्दल लोक कधी विचार करतात याला फार महत्त्व नाही. परंतु मदत देणे म्हणजे अनिश्चितकाळापर्यंत पैसे देऊ नयेत. सहानुभूती ठेवावी. परंतु मदत निश्चित सीमेपर्यंत करावी.